इतर मुलांशी का बोलतेस? म्हणत भररस्त्यात तरुणीला काठीनं मारहाण, अकोल्यात तरुणाचा संतापजनक Video

गुन्हा: भर रस्त्यात एका तरुणीला काठीने मारहाण करतानाचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे .खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत .व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय .

नेमकं प्रकरण काय?

राज्यभरात महिलांवर होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अकोल्यातील एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . ‘तू इतर मुलाशी का बोलते? या कारणावरून भर रस्त्यात एका मुलीला हातातील काठीने जबर मारहाण केल्याची घटना अकोल्यात घडली आहे .मुलगा आणि मुलगी दोघेही जण अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे .मारहाण करत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय . व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय .तू इतर मुलांची का बोलते ?या कारणावरून त्यानेही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे .विशेष म्हणजे रस्त्यावर घडलेल्या या घटने दरम्यान मारहाण करत असताना कोणीही या मुलाला रोखण्याचाही प्रयत्न केलेला नाही .या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतलीय .त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांची भेट घेतल्यानंतर अखेर मुलीचे आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे .या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत .दरम्यान  मारहाण करणाऱ्या मुलाचा खदान पोलीस शोध घेत आहेत .

कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड

राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या (Murder News) करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एकच खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-

Kolhapur Crime: कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड, धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं, चकीत करणारं कारण समोर!

आणखी वाचा

Comments are closed.