शेतकऱ्यांचा बांधावरील वाद थांबता थांबेना, कानडी घाट गावात तृण काढण्यावरून दोन गट पुन्हा भिडले
अंडी बातम्या: बीड जिल्हा आणि हाणामारी जणू समीकरणच बनले आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण कालच(17 जून) एका महिला शेतकर्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवंत मारण्याची घटना ताजीच असताना, आज(18 जून) पुन्हा एक हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. बीड तालुक्यातील कानडी घाट येथे शेतातील तृण काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. “तू आमच्या शेतातील तृण का काढतेस?” या कारणावरून एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली गेली. याप्रकरणी शिवकन्या झोडगे या महिलेच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या सततच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांमधील वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांची ‘पोलीस आपले बांधावर’ संकल्पना
शेत जमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी ‘पोलीस आपले बांधावर’ ही संकल्पना सुरू केलीय. मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधावरून आणि वादातून मोठे वाद उफाळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आणि यालाच रोख लावण्याकरिता पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस आपले बांधावर ही संकल्पना राबवत आहेत.
खरी पूर्व हंगामात शेती मशागतीचे कामे सुरू असताना शेतातील बांधावरून अनेकदा वाद समोर येतात. याचे रूपांतर हाणामारी होते. आणि यातून गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतात. पोलिसांकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री करून योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
मुलीच्या लग्नाचे स्वप्न उध्वस्त, बँकेच्या गेटवर गळफास घेऊन बापाने संपवले जीवन
बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.
हे ही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.