बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं: देवेंद्र फडणवीस

सुधाकर बॅडगुझरवरील देवेंद्र फड्नाविस: ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर माजी उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मंगळवारी (दि. 17) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून (BJP) सुधाकर बडगुजर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबतचे सुधाकर बडगुजर यांचे कनेक्शन देखील भाजपने समोर आणले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पनाच नव्हती. मात्र चंद्रशेखर बावनकुळे ऐनवेळी सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला हजर झाले. त्यामुळे काल दिवसभर सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात गाजला. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की, त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणे यांनी रिलीज केला होता. पण, त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की, जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर चौकशीअंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ते शिवसेनेत असताना ते तेव्हा या पक्षात आले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याविरुद्धचे उमेदवार ते होते. शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली.

बडगुजरांनी भाजपच्या नियमांनी वागावे

शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेली आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचे स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की, त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागले पाहिजे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांना क्लीन चीट दिली आहे.

विरोध कोणाचाच नव्हता

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, काल ज्यावेळेस पक्षप्रवेश ठरला, त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना त्या संदर्भात सकाळी कल्पना नव्हती की कालच प्रवेश आहे. नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सर्वांना समजावले होते की, आपल्याला का त्यांना प्रवेश द्यायचा आहे. बावनकुळे यांचा कुठेही पक्षप्रवेशाला विरोध नव्हता. ज्यावेळेस गिरीश महाजन यांनी सांगितलं की, आजच प्रवेश ठरलेला आहे, त्यावेळेस बावनकुळे स्वतः पक्ष प्रवेशाला  हजार होते.  त्यामुळे मला असे वाटते की, हा फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, विरोध कोणाचा नव्हता. अनेक स्तरावर त्यांच्या पक्ष पक्षप्रवेशाला विरोध झाला. पण त्यांनाही आम्ही सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Sanjay Raut : भाजप हा देशद्रोही आणि बकवास पक्ष, सलीम कुत्ता सोडा, दाऊदलाही पक्षात आणतील; बडगुजरांच्या प्रवेशानंतर राऊतांचा हल्ला

आणखी वाचा

Comments are closed.