सुनील तटकरेंच्या अघोरी विद्या बाहेर काढणार, माझ्याकडे सर्व डिटेल्स; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशा

सुनील तत्कारे वर महेंद्र दालवी: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी मोठा दावा केला आहे. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार, त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल अघोरी विद्येच्या व्हिडिओवर बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी येणाऱ्या काही दिवसात आपण सुध्दा सुनील तटकरे यांच्या अनेक अघोरी विद्या लवकरच बाहेर काढू आणि त्याबाबत माझ्याकडे पुराव्यासह सगळं आहे, असे म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

सुनील तटकरेंच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार

भरत गोगावले यांचा तो नेहमीच स्वभाव आहे. ते रोज अंघोळ झाली की, कार्यकर्त्यांना अशा वेशात भेटायला येतात. मात्र विरोधकांनी भरत गोगावले यांनी अघोरी विद्या केली, असे चित्र उभे केले. सुनील तटकरे हे सुध्दा निवडणुकीमध्ये कोणते पद हवं असेल तर भय्यूजी महाराज यांच्याजवळ जाऊन अघोरी विद्या करून घ्यायचे. त्यांची ही अघोरी विद्या वेळ आल्यावर बाहेर काढेन, असा इशारा त्यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिलाय. आता महेंद्र दळवी यांच्या इशाऱ्यावर राष्ट्रवादी अजित पवार काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भरत गोगावले पालकमंत्री होणे हा आमचा अधिकार

दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील महेंद्र दळवी यांनी वक्तव्य केलं आहे. मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणे, हा आपला अधिकार आहे, असा आग्रह महेंद्र दळवी यांनी अलिबागमधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत केला आहे. पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांनी अनेक वेळा त्याग केला. मागचे सरकार बनवण्यात भरत गोगावले यांचा हातखंडा असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. सुनील तटकरे यांची नियत ही आपल्याच पदरात पाडून घेण्याची आहे. मात्र, त्यांचा या वृत्तीला आता छेद करण्याचं काम आपल्याच माध्यमातून करू, असे महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Shivsena UBT: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवट्यांना महत्त्व; गोगावलेंच्या अघोरी पूजा व्हिडीओवरून ‘सामना’तून जहरी टिका

आणखी वाचा

Comments are closed.