धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं

केले: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं आहे. (Sucide)

डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीव संपवल्याची घटना सुन्न करणारी ठरली आहे. (Dr Javarkar Sucide)

विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या

या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतःच इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे ही घटना आणखी धक्कादायक समजली जात आहे.

वळसंगकर आत्महत्या प्रकरणत दोषारोपपत्र

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या (shirish valsangkar death case) प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आत्महत्येच्या 59 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळे विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. दोषारोप पत्रात अटकेतील आरोपी मनीषा मुसळे ह्याच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. दोषारोप पत्रामध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ‘मनीषा हिची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते.’ शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.  त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.

हेही वाचा

मोठी बातमी : सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

आणखी वाचा

Comments are closed.