अकोल्यात दोन गटात गॅंगवॉर; ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड
चिम न्यूज: अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढलीये. अर्थातच खाकीने गुन्हेगाराची मस्ती उतरवलीये. काल(18 जुलै) अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद होत गॅंगवॉर (Crime News) झाला होता. वर्चस्वाच्या लढाईतून हा गॅंगवॉर झाला होता. यात तलवारीसह बंदुकीचा या वादात वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडले. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास 8 जण जखमी झाले होते. घटना स्थळावर गोळीबार देखील झाला होता. घटनास्थळावरून 2 जिवंत काडतूस आणि एक हवेत गोळी फायर केली होती. दरम्यान, काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या (Akola Crime News) शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
वर्चस्वाची लढाईतून वाद, सात आरोपींसह पिस्टल आणि तलवारी जप्त
पुढे आलेल्या माहितीनुसार, आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. अशातच यातील दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची आता कृषी नगर परिसरात धिंड काढण्यात आली. सद्यस्थित या प्रकरणात सात आरोपींसह देशी बनावट पिस्टल आणि तलवारी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली. तसेच यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावर जाणार नसल्याचे आरोपींनी कान पकडून पोलिसांना सांगितले.
ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड
दरम्यान, अकोल्यात झालेल्या दोन गटातील गॅंगवॉरचा हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीच वातावरण पसरल होत. तर अटक करण्यात आलेल्या सतीश वानखडेसह आकाश गवई आणि काही प्रमुख गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली असून त्यांना चांगलाच धडा पोलिसांनी शिकवला आहे.
….अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला
जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शिताफीनं त्याला अटक केली आहे. बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. मात्र, पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं आहे.
विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र जन्मठेप झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला. आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते. मात्र, विठ्ठलचा याला विरोध होता. यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने 2014 मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राण घातक हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी होता.या प्रकरणात सत्र न्यायालयाने विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.