त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं; मुंबईतील मन सुन्न करणारी घटना
मुंबई क्राइम न्यूज मुंबई: मुंबईत माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार समोर (Mumbai Crime News) आला आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वत:च्याच आजीला नातवाने आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सदर घटनेची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात, अशी माहिती त्यानी पोलिसांना दिली असून पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत. यशोदा गायकवाड यांना बोलता येत नाही. त्या फक्त नातू-नातू असं सांगत आहे. त्यामुळे आरे पोलिसांना वृद्ध आजीचा कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. आरे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास करत आरे पोलीस वृद्ध आजीचा कुटुंबीयांचा शोध घेत आहेत, अशी माहिती आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
60 वर्षीय यशोदा गायकवाड यांना त्वचेचा कॅन्सर होता. यामुळे त्यांच्या नातवाने त्यांना मुंबई उपनगरमधील आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. यशोदा गायकवाड या मालाडमधील रहिवाशी आहेत. त्या नातावासोबत वास्तव्यास होत्या. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी यशोदा गायकवाड यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या कूपर रुग्णालयात यशोदा गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच यशोदा गायकवाड यांच्या नातेवाईकांचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
कामोठ्यात हिट ॲण्ड रनचा थरार-
नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 येथील सरोवर हॉटेलसमोर मद्यधुंद चालकाने स्विफ्ट कारने एका महिलेला धडक दिली. अपघातानंतरही चालकाने वाहन न थांबवता पुढे जाऊन पार्किंगमधील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले.पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.आरोपी ला वैद्यकीय चाचणी करिता रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=LEJD2SVBWQY
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.