किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घ
चंद्रपूर गुन्हा: चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे .सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे . या घटनेने संपूर्ण चंद्रपूर शहर हादरले आहे . चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील 5 दिवसांपूर्वी घडलेल्या खुनाचा उलगडा झाला आहे . (crime News)
नेमकं घडलं काय ?
चंद्रपूर शहरातील राजुरामध्ये 15 जून रोजी एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती . आता पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा झाला असून संपूर्ण शहर हादरले आहे . राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने वार करत महिलेचा खून केल्याचं समोर आला आहे . कविता रायपुरे (53) असे मृत महिलेचे नाव आहे .
कविता रायपुरे यांचे रमाबाई नगर येथे किराणा दुकान होते .घटनेच्या दिवशी एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या दुकानात आला . मुलाने महिलेकडे सिगारेट उधारीवर मागितली .मुलाकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सिगारेट देण्यास नकार दिला .उधारीवर सिगारेट न दिल्याचा राग मनात ठेवून रात्री 12 ते 1च्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहत आरोपी अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारत आत शिरला . महिलेच्या घरात शिरून धारदार शस्त्राने वार करत कविता रायपुरे या महिलेला ठार केले .महिलेला तिथेच सोडून आरोपी मुलगा फरार झाला .
पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं
घटना उघडकीस आल्यानंतर राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .घटनेचा पंचनामा करत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला .नंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपी तरुणास बाहेरगावातून ताब्यात घेण्यात आले . घटनेच्या पाच दिवसानंतर तपासात पोलिसांना यश आल्या असून अल्पवयीन आरोपीला राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .आरोपी विरोधात कलम 332 (ब ), 103 (1) या कलमान अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सिगारेट उदाहरण दिल्याच्या रागातून घडलेल्या या साऱ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे . अनेक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि 40 हून अधिक संशयितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि सिगारेटच्या वादामुळे त्याचा राग आला असे सांगितले. त्याच्या ताब्यातून खून करण्यासाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्याधापक पित्याची मुलीला बेदम मारहाण, लेकीने जीव सोडला
बारावीत शिकणाऱ्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून शाळेत माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण करत संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली. याप्रकरणी धोंडीराम भोसले या पित्यास अटक करण्यात आली आहे. परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणत धोंडिराम यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.