शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला

चंद्रपूर : राज्यात गेल्या काही दिवसांत लाच (Bribe) लुचपतप्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक छोटे-मोठे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीच्या महिला क्रीडा अधिकाऱ्यांस लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूरचे तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. एसीबीएन (एसीबी) तहसलीदार गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाठी फरार आहे. सध्या, एसीबीकडून आरोपी तलाठीचा शोघ घेण्यात येत आहे.

बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघेही लाच प्रकरणात अडकले आहेत. फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरूमाचे उत्खनन केले होते. मात्र, हे उत्खनन अनधिकृत असल्याचे सांगत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण असून मिटविण्यासाठी लाच मागितली होती. संबंधित महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे 2 लाख 20 हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केली होती. लाच म्हणून ठरलेल्या या रकमेतील 1 लाख 20 हजार रुपये शेतकऱ्याने त्यांना देऊ केले होते. तर, उर्वरीत 1 लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता. त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने या लाचखोरीची एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली.

दरम्यान, एसीबीच्या कारवाईत तहसीलदार अभय गायकवाड आणि कवडजई सांजाचे तलाठी सचिन पुकळे यांना अटक करण्यात आली असून त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. एसीबीने तहसीलदाराला ताब्यात घेतले असून तलाठी पुकळे फरार आहे. याप्रकरणी, एसीबीकडून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा

रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले

अधिक पाहा..

Comments are closed.