भाऊ घरी नव्हता; सोसायटीबाहेर भाजीवाल्याकडे गर्दी; कोंढव्यातील तरुणीच्याच घरी आरोपी कसा शिरला? न

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत कुरिअर बॉय असून पार्सल (Pune Crime News) देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या डिलिव्हरी बॉयने आयटी अभियंत्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्या नराधमाने तरुणीच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढून ‘मी पुन्हा येईल, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करेन’ (Pune Crime News) असा मेसेज टाइप केला होता. यावेळी आरोपीने त्या तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला. त्यामुळे तरुणी बेशुध्द झाली. सुमारे तासाभराने तरुणीला शुद्ध आली. त्यानंतर मोबाइलमधील फोटो आणि मेसेज पाहून लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची दहा पथके आरोपीचा शोध घेत आहेत. (Pune Crime News)

पीडित तरूणी कोंढवा परिसरात आपल्या भावासोबत राहते

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या भावासोबत गेल्या वर्षभरापासून कोंढवा परिसरात राहायला आहेत. ही तरुणी कल्याणीनगर येथील एका कंपनीत नोकरी करते. तर, तिचा लहान भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तरुणीचा भाऊ गावी गेल्यामुळे तरुणी सध्या घरी एकटीच होती. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुरिअर कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याची बतावणी करून आरोपी सोसायटीमध्ये शिरला. तो तरुणीच्या फ्लॅटबाहेर गेला. तरुणीने घराचा दरावाजा उघडला. मात्र, सेफ्टी दरवाजा बंदच होता. त्यावेळी त्याने ‘तुमचे बँकेचे कुरिअर आले आहे,’ अशी बतावणी केली. तरीही तिने ‘माझे पार्सल नाही,’ असे म्हणत त्याला नकार दिला. तेव्हा त्याने ‘तुमची स्वाक्षरी घ्यावी लागेल’ असे म्हणत तरुणीला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडलं.

त्याच्या कागदावरती सही करण्यासाठी पेन घ्यायला म्हणून तरुणी आतील रूममध्ये गेली. त्यावेळी त्याने फ्लॅटचा दरावाजा बंद करून घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर केमीकल स्फ्रे मारला त्यावेळी तरूणी बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केले. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. ही घटना घडलेली इमारत बहुमजली असून, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक; तसेच सीसीटीव्ही देखील आहेत. पोलिसांनी सोसायटीत प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या अशा दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. इमारतीत असंख्य फ्लॅट आहेत. मात्र, आरोपी नेमका पीडितेच्याच फ्लॅटमध्ये कसा गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याने रेकी केली होती का, आरोपी तिला ओळखतो का, त्याने पाळत ठेवली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

फ्लॅटचा सेफ्टी डोअर उघडल्यानंतर…

घटनेतील आरोपी तब्बल 30 तासानंतर देखील मोकाट आहे. पुण्यातील कोंढव्यात कुरियर बॉयचा बनाव करून त्याने घरात प्रवेश केला. फ्लॅटचा सेफ्टी डोअर उघडल्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारून घरात घुसला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी 30 तासानंतरही मोकाट असल्याने सुरक्षेबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पोलिसांची दहा पथक या आरोपीचा शोध घेत आहेत. काल पोलिसांनी दोन संशय व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. या संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा होणं बाकी आहे. तरुणीने तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला आहे, त्या तरुणीकडून देखील पोलीस वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती गोळा केली जात आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली असा जा तरुणीने दावा आहे त्या सर्व बाबींची खातरजमा केली जात आहे. त्या सोसायटीमधले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्याचबरोबर तरुणीचा भाऊ दुसऱ्या गावाला गेलेला आहे, याची देखील माहिती घेतली जात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास दोन्ही बाजूंनी सुरू आहे. या प्रकरणातील संशयीताला पकडण्यासाठी 10 पथके तपास करत आहेत, त्याचबरोबर ज्या तरुणीने अत्याचार केल्याचा दावा केलेला आहे तिच्याकडून देखील तपास सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=Z8UH1LPW1D8

आणखी वाचा

Comments are closed.