OYOमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी? इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर.., : सुधीर मुनगंटीवार
ओयो वर सुधा मुंगतीवार: सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session 2025) सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) हे अनेक सवाल उपस्थित करत आहेत आणि आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. अशातच सोमवारी (7 जुलै) भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओवायओचा (OYO) मुद्दा उपस्थित केला. यात ओयोमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? शहरांपासून दूर असणाऱ्या या हॉटेल्समध्ये नेमकं काय सुरु असते? हा अभ्यासाचा विषय आहे, याचा पोलीस विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी करत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये शंका उपस्थित करत अनेक सवाल केलेत. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलचा मुद्दा उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
‘ओयो नावाची एक हॉटेल चेन तयार झाली आहे. शहराच्या 20-20 किमी दूर एका निर्जन ठिकाणी OYO… मग मनात शंका आली की ही OYO हॉटेल चेन काय आहे? ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे. या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही. कोणत्याही महापालिकेची परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने मिळते, ही कशासाठी दिली जाते, हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. OYO च्या माध्यमातून 20 -20 किलोमीटर वर कोणीही प्रवासी जाऊन राहत नाही. हा प्रवासी तिथं गेला म्हणजे त्याच अर्थशास्त्र कच्च आहे. कारण OYO पेक्षा शहरातील एका हॉटेलमध्ये राहणे जास्त स्वस्त आहे. असेही ते म्हणाले.
‘खरंतर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे, इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर गृहराज्यमंत्री बसले आहेत. त्यांनी OYO चा अभ्यास करावा आणि महाराष्ट्रात किती OYO आहेत, याची माहिती मंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे’, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये केलं.
https://www.youtube.com/watch?v=G5ZS9RSH4FM
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.