मायलेकीवर दृष्ट आत्म्यांचा प्रभाव, भोंदू बाबानं यातनागृहात डांबून ठेवलं; यवतमाळ हादरलं!
यवॅटमल गुन्हेगारीच्या बातम्या: यवतमाळ शहरातील कॉटन मार्केटमध्ये वंजारी फैलात राहणाऱ्या भोंदू बाबाच्या घरी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड टाकली. या घरातील एकूण वातावरण आणि मायलेकीसाठी तयार केलेले यातनागृह पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदू महादेव परसराम पालवे यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र या अघोरी कृत्याच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, महादेव उर्फ माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदू ने स्वतःच्या घरात बुवाबाजीचे दुकान थाटले होते. त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला जाळ्यात ओढले तिच्यावर दृष्टात्म्याचा प्रभाव पडला आहे, असे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे सांगत घरी आणले. तिच्यासोबत 14 वर्षाची मुलगी त्रिशा सुद्धा भोंदू बाबाकडे राहू लागली. सुरुवातीला या दोन्ही मायलेकी अतिशय धष्टपुष्ठ व मानसिक दृष्ट्या स्थिर दिसत होत्या, असे शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळाले. नंतर मात्र या भोंदूने त्यांच्यावर आघोरी उपचार सुरू केले. त्या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्राची खोली तयार केली. या खोलीतच दिवस रात्र व मायलेकी राहत होत्या. त्यांना सध्या लघुशंकेसाठी ही बाहेर पडण्याची उजागरी नव्हती. तिथेच त्यांना हा विधी करावा लागत होता. उपचाराच्या नावाखाली महादेव त्या मायलेकींना गरम सळाखीने चटके देत होता. मारहाण करीत होता. त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना दिसल्या.
बाल अधिनियम व जादूटोणा कायद्यानुसार कारवाई
माय लेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केले असता त्या दोघींवर आघोरी उपचारा सोबतच भोंदू महादेवने शारीरिक अत्याचार केले का याचीही तपासणी केली जाणार आहे. त्रिशाच्या तक्रारीवरून भोंदू बाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक वादातून मायलेकिला जबर मारहाण; चौघिंविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.
उसने घेतलेले पैसे लवकर परत दिले नाही अशा आर्थिक वादातून चार महिलांनी माय लेकींना लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात घडली . या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विमल धांडेकर , कमल धांडेकर , सुमन चव्हाण , दिपाली मंजुळकर अशा चौघीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मायलेकींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.