प्रियकराच्या मदतीने पत्नीने अर्धांगवायु पतीला संपवलं; नैसर्गिक मृत्यूचा बनाव ही रचला, पण….

नागपूर गुन्हेगारीच्या बातम्या: प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. कहर म्हणजे पतीच्या हत्येनंतर पत्नीने पतीचा नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव ही केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालातून सर्व बिंग फुटलं आणि पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा दुसऱ्या धर्मातील प्रियकर दोघांना अटक केली आहे. नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, पती प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीने कट रचला आणि प्रियकराचा मदतीने झोपलेल्या पतीचा नाक तोंड दाबून गळा आवळून खून केल्याची घटना घडली. आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबु टायरवाला अस प्रियकराच नाव असून दिशा रामटेके असं आरोपी पत्नीचं नाव आहे. दिशा रामटेकेचे मृतक चंद्रसेन सोबत 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा पासून ते घरीच राहत होते.

घरखर्चासाठी पाण्याच्या कॅनच्या विक्रीचा व्यवसाय अन् प्रेमाला पालवी फूटली, अन्..

दरम्यान, दिशा रामटेके ही घरखर्च भागविण्यासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती. याच दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिची ओळख आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू सोबत झाली. हळू हळू दोघाआधे प्रेम सबंध वाढले. कालांतराने पतीला संशय आला, त्यामुळे अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून त्याचा काटा काढण्याच्या उद्दिष्टाने दिशाने प्रियकर आसिफ अन्सारीच्या मदतीने झोपलेल्या चंद्रसेनच्या नाका तोंडावर उशी ठेवून आणि गळा आवरून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर असिफ अन्सारीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. अशी माहिती वाठोड़ा पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली.

उच्चभ्रू आणि अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात दिवसाढवळ्या चोऱ्या

नागपुरातील उच्चभ्रू आणि अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरामध्ये चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोऱ्या करणे सुरू केलं आहे का??? चोरांना कोणाचीच भीती नाही का?? असे प्रश्न शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घटनेमुळे निर्माण झाले आहे. नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजीनगर परिसरात भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार अजय संचेती यांच्या घराच्या अगदी शेजारी देवदत्त वैद्य यांच्या घरी चोरट्यानी दिवसाढवळ्या कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे.. या घटनेत चोरट्यानी हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून एका बाईकवर ट्रिपल सीट बसून आलेले चोरटे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वैद्य यांच्या घरी शिरले. वैद्य कुटुंब पुण्याला गेले असता ही घटना घडली असून चोरट्यानी कोणालाही न घाबरता भर दिवसा मुख्य रस्त्यावरील गेटचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केलं आणि नंतर इतर कुलूप तोडत घरात चोरी केल्याचे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.