‘मला काही माहिती नाही’ म्हणणारे गोपीचंद पडळकर राड्यावेळी काचेच्या मागे उभे, आव्हाडांनी व्हिडीओ
जितेंद्र अवहाद आणि गोपीचंद पडलकर संघर्ष: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख (Nitin Deshmukh) याला मारहाण केली. विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. मात्र, या सगळ्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ‘मला काही माहिती नाही’, ‘मी आत्ताच इथे आलो’, असे सांगून या घटनेपासून नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करणारे गोपीचंद पडळकर ही घटना घडली तेव्हा तिकडेच होते, हे समोर आले आहे.
ह्या व्हिडिओत कुणी मारले कुणी मारायला सांगितले हे स्पष्ट होते#गुंदाराज pic.twitter.com/vvdds53qom
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे विधिमंडळाच्या लॉबीच्या काचेच्या गेटबाहेर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानात काहीतरी सांगताना दिसत आहेत. गोपीचंद पडळकर यांचा हा ‘कानमंत्र’ मिळाल्यानंतर ऋषिकेश टकले आणि त्यांचे कार्यकर्ते काचेच्या गेटमधून आतमध्ये गेले आणि थेट विधिमंडळाच्या लॉबीत उभ्या असलेल्या नितीन देशमुख याच्यावर हल्ला चढवला. हे सगळेजण नितीन देशमुख लॉबीतून बाहेर येण्याची वाट बघत होते, असे व्हिडीओतून दिसत आहे. नितीन देशमुख गेटमधून बाहेर पडणार इतक्यात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला घेरुन मारायला सुरुवात केली. या झटापटीत गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि नितीन देशमुख परत विधिमंडळाच्या लॉबीत आत ढकलले गेले. तेव्हा गोपीचंद पडळकर हे काचेच्या बाहेरून आत काय चालले हे बघत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मात्र, या राड्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारताच गोपीचंद पडळकरांनी हसतहसत ‘मला काय झाले ते माहितीच नाही’, असे सांगितले.
या सगळ्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकर हे भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना जाऊन भेटले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे, सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=aosldn9_lga
आणखी वाचा
विधानभवन लॉबीतच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा संताप; गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Video: आव्हाड-पडळकर समोरासमोर भिडले; तुझ्या गांxx दम किती बघतो, विधानभवनाबाहेरच नेत्यांचा राडा
आणखी वाचा
Comments are closed.