मी कार्यकर्त्यांना कधीच एकटं सोडत नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी फरक पडत नाही

जितेंद्र owhad: विधिमंडळाच्या प्रांगणात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नितीन देशमुख या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. मात्र, पोलिसांनी पडळकरांच्या फक्त एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खुणावलं आणि त्यानंतर त्यांनी नितीन देशमुखला मारहाण केली. ते मला मारण्यासाठी आले होते. मात्र, बिचाऱ्या नितीनने माझ्यासाठी मार खाल्ला, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ते शुक्रवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी पोलिसांना मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींची नावे देतो. नितीन देशमुख याला मारहाण करणाऱ्यांमध्ये गणेश विठ्ठल भुते (भिंगेवाडी, आटपाडी, ३०७ च्या गुन्ह्यातील आरोपी ) या सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. उर्वरित चार जणांमध्ये ऋषिकेश टकले (माळवाडी पलूस), महादेव पाटील (वनपुरी आटपाडी), लक्ष्मण जगदोंड(जत) आणि कृष्णा रासकर (मुख्य सुरक्षा अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई)  यांचा समावेश आहे. या पाच जणांना नितीन देशमुखला मारले. यानंतर दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र फक्त नितीन देशमुखला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुसरा आरोपी कुठे गेला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. नितीन देशमुख याच्या चारित्र्यावर आरोप करा किंवा काही करा, त्याचा काही काल दोष होता का? त्याचा राग अनावर झाला त्याला उद्विग्न केलं आणि स्वाभाविक हे सगळं झालं, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

मी या सगळ्याविरोधात पोलिसांना जाब विचारला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. माझं अर्ध आयुष्य आंदोलनात गेले आहे. त्यामुळे मला गुन्हा दाखल झाल्याने धक्का वगैरे बसलेला नाही. आंदोलन करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे.  मी कार्यकर्त्यांसाठी लढणार माणूस आहे. माझ्यावर काय गुन्हा झाला तरी मला फरक पडत नाही. मी कार्यकर्त्यांना एकटं सोडत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले.

काल माझी आणि जयंत पाटील यांची फसवणूक झाल्याची भावना आमच्या मनात आहे. कालच्या मारहाणीनंतर नितीन देशमुखला मागे बसवून ठेवण्यात आले. सभागृहाचे कामकाज संपल्यावर आम्ही त्याला सोडू असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांनी मला दिले. नंतर मला फोन आला, पोलीस नितीन देशमुखाला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. मी इकडे येऊन पोलिसांनी विचारले तर ते म्हणाले, आम्हाला वरुन आदेश आहे. विधानसभा अध्यक्ष शब्द देतात पण पाळत नाहीत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=gypdqbquihus

आणखी वाचा

गोपीचंद पडळकरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकटा भिडणारा नितीन हिंदुराव देशमुख कोण?

आणखी वाचा

Comments are closed.