गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, 22 बारबाला पकडल्या, अनिल परबांचा
Anil Parab on Yogesh Kadam : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2025) आज शेवटचा दिवस आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम (Jyoti Kadam) यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. “डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय.
अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली,त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे त्यांनी म्हटले.
गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा. अजित दादा तुम्ही योग्य ती कारवाई कराल. जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल, असे देखील अनिल परब म्हणाले. सध्या शरमेने मान खाली जातं आहे. आजू बिहारमध्ये म्हणत आहे की, तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का? गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जातं असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केलाय.
जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का?
विधान परिषदेत अनिल परब पुढे म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांकडे आम्ही गेलो होतो. त्याठिकाणी आमच्या पीएला खाली उतरवलं? का उतरवलं तर म्हणाले की राज्यपाल यांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. आता राज्यपाल सुरक्षित नसेल तर काय उपयोग? जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का? काल विधीमंडळात मारामारी झाली, आमदार सुरक्षित नाहीत. सचिन पाटील नावाचा आरटीओ अधिकारी आहे, त्याचा ड्रायव्हर कंत्राटी होता. त्याचं कंत्राट संपलं आहे तरी हा ड्रायव्हर आहे. अधिकाऱ्याचे कपडे घालून चलन कापत आहे. तो अधिकारी गाडीत बसतोय आणि त्याचा ड्रायव्हर मशीन हातात घेऊन चलन काढत आहे. मी याचे फोटो पाठवतो. त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
https://www.youtube.com/watch?v=dua2uqqr2k0
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.