रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा

सूरज चवान चावा संघटना: महाराष्ट्राचं राजकारण आता किती रसातळाला गेलंय हे दर्शवणारी घटना काल (20 जुलै) लातूरमध्ये (Latur) घडली. विधान परिषदेचं कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान मारहाण केली. युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेचे (Chava Sanghatana) प्रतिनिधी विजय घाडगे (Vijay Ghadge) यांना बेदम मारहाण केली. सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. सदर घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं? (Suraj Chavan Latur Rada)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काल (20 जुलै) लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत त्यांनी निवेदन दिलं. त्याचवेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले. यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार मारलं. सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांच्यासह हाताच्या कोपराने, बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली.

आज लॅटूर बंदीचा हॉल आहे.

अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणच्या निषेधार्थ  आज  लातूर बंदची हाक देण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगेंना मारहाण केली होती. सुरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि शासन होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. आज लातूर बंद आणि परवा लातूर जिल्हा बंदच आयोजन करण्यात आला आहे. यात सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे.

कोणत्या व्हिडीओमुळे वाद सुरु झाला? (Manikrao Kokate Rummy Video)

नुकतंच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे चांगलच गाजलं. अधिवेशन संपलं पण नेतेमंडळींचे कारनामे काही संपत नाहीय. आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे  पडळकर यांच्यानंतर कृषिमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळतायत असा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडीओ ट्विट केला आणि त्यानंतर राज्यातल्या राजकारणात एक नवा वाद सुरु झाला. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्र्यांचा हा खेळ पाहून नेमकं काय म्हणावं?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

सुरज चव्हाण काय म्हणाले?

सदर घटनेनंतर सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे कार्यकर्ते आले होते, त्यांनी असंवैधानिक मागणी भाषेचा वापर केला आहे. त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच होते. तसेच त्यांनी त्यांच्या मागणीचं पत्र सुनिल तटकरे यांना दिले होते. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली. पण त्यांनी तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. बाहेर जात असताना असंवैधानिक भाषेतचा वापर केला. त्यामुळं आमच्याकडून अशा प्रतिक्रिया उमटल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसे उत्तर देणार असल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. अंगावर पत्ते टाकणे, असंवैधानिक भाषेचा वापर करणे हे कितपत योग्य वाटतं? सत्तेत आहोत याचा अर्त आम्ही सगळेच चूक करतो असे नाही. सत्तेत आहोत याचा अर्थ आमच्या नेतृत्वावर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असे सुरज चव्हाण म्हणाले.

छावा संघटनेचे विजय घाडगे काय म्हणाले?

कोणताही व्यक्तीगत द्वेष नव्हता, कोणतीही वैयक्तीक मागणी नव्हती. राज्याचा निष्क्रीय कृषीमंत्री बदला हे म्हणणं जर चुकीचं असेल  तर अतिशय वाईट घटना आहे. मला बच्चू कडून, राजू शेट्टी मनोज जरांगे पाटील रविकांत तुपकर यांनी फोन केल्याचे विजय घाटगे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या पोरातला हा संताप आहे. राष्ट्रावादीची जी सत्तेची मस्ती आहे ती मस्ती शेतकऱ्यांची पोरं फतरवल्याशिवाय राहणार नाहीत असे विजय घाटगे म्हणाले. शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषीमंत्री भेटला आहे. त्याबाबात आम्ही बोलायचं नाही का? असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल असं आव्हान विजय घाटगे यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. नेमकं काय झालं याची माहिती घेणार आहे. पण अशा प्रकारच्या घटना निश्चितच समर्थनीय नाहीत असे तटकरे म्हणाले. मी वर मीटिंगमध्ये होतो खाली काय झालं हे मला माहित नाही, पण असं होणं योग्य नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

मनोज जरांगे अन् बच्चू कडूंचा विजय घाडगेंना फोन-

मारहाणीच्या सदर घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी फोन केल्याची माहिती विजय घाटगे यांनी दिली.

कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण करणार सूरज चव्हाण कोण? (Who Is Suraj Chavan)

– राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष
– अजित पवारांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते
– एकसंध राष्ट्रवादीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष
– सूरज चव्हाण लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे रहिवासी
– पक्षफुटीदरम्यान अजित पवारांसोबत जाणाऱ्या पहिल्या 10 नेत्यांतले नेते
– 2019 ला अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात भूमिका

देवेंद्र फडणवीसांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा- रमेश केरे

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेत निवेदन घेऊन गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली.. यावर अखिल भारतीय स्वाभिमानी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश केरे पाटील यांनी या घटनेचा निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांचा देखील राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. तसेच सुरज चव्हाण यांना छावा स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याचे रमेश केरे यांनी म्हटले आहे.

लातूरमध्ये राडा, नेमकं काय घडलं?, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=j6ugl_hpj3e

संबंधित बातमी:

सूरज चवन: दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं

आणखी वाचा

Comments are closed.