छावा संघटनेला शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा, म्हणाले, ‘दादागिरी, जबरदस्ती चालणार नाही’

Shivendraraje Bhosale on Chhava Sanghatna : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समोर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले होते. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात अनेक ठिकाणी सुरज चव्हाणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज लातूर बंदची हाक दिली. यावरून मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी छावा संघटनेला इशारा दिलाय.

छावा संघटनेला शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा

छावा संघटनेकडून लातूर बंद केल्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लोकशाहीमध्ये आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे. जिल्हा प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. त्याचबरोबर सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरलं जाऊ नये. ज्यांना स्वतःहून बंद मध्ये सहभागी व्हायचं आहे ते होतील. पण, जबरदस्ती आणि दादागिरी चालणार नाही, यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, असा इशारा छावा संघटनेला दिलाय.

सुरज चव्हाणांचा राजीनामा

दरम्यान, सूरज चव्हाण यांच्या विरोधात छावा संघटनेसह इतर मराठा संघटना देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली. सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आले. तसेच अजित पवार यांनी सोमवारी सूरज चव्हाण यांना तातडीने मुंबईला भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, सूरज चव्हाण यांनी कालच्या मारहाणीत बोट फ्रॅक्टर झाल्याचे कारण पुढे केले होते. त्यामुळे आपण उपचारासाठी लातूरमध्येच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यामागे अजितदादांची भेट टाळून कारवाई लांबवण्याचा सूरच चव्हाणांचा प्रयत्न होता का? अशा प्रश्नही उपस्थित झाला होता. मात्र, अजित पवार यांनी मराठा संघटनांचा रोष वाढत चालल्याने सूरज चव्हाण भेटायला येण्याचीही वाट न पाहता थेट ट्विटरवरुनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या. तर सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Rohini Khadse on Suraj Chavan Resignation : अजितदादांनी मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी दिला, सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

आणखी वाचा

Comments are closed.