संजय शिरसाटाचं मंत्रीपद खरचं जाणार का? संजय राऊतांच्या दाव्यावर नेमकं काय म्हणाले शिरसाट?

sanjay Shirsat Majha Katta : मंत्रीमंडळातून आट मंत्री जाणार असून, मंत्रीमंडळाची फेररचना होणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचे देखील नाव आहे. आज यावर संजय शिरसाट (sanjay Shirsat ) यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी सांगितलं म्हणजे उलटं होणार. संजय राऊतांचं एक भाकीत सत्य झाल्याचं उदाहरण मला दाखवा असेही शिरसाट म्हणाले. सरकार जाणार, उद्या पडणार, आठ दिवसांनी पडणार, हे होणार ते होणार सगळी भाकित करुन राऊत थकलेला आहे असे शिरसाट म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर तर ते वाट्टेल ते बोलला असल्याचे शिरसाट म्हणाले.

आम्ही भविष्यवाणी केली आहे आम्ही खरे होतो

आम्ही खरं सांगत होतो, आम्ही केलेली भाकित खरी झाली आहे. आम्ही सांगत होतो की अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार ते भाजपमध्ये आले. आम्ही सांगत होतो, अजित पवार पक्ष सोडणार म्हणालो होतो सोडला की नाही. या संजय आणि त्या संजयमध्ये तो तर फरक आहे असे शिरसाट म्हणाले. मंत्रीपद कायम राहणार की नाही याची चिंता मी करत नाही. मंत्रीपद राहणार की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील असे शिरसाट म्हणाले.

सामाजिक न्याय खात्यावर काम करायला संधी

सामाजिक न्याय खात्यावर काम करायला संधी आहे. ग्राऊंड लेवकर या खात्याच्या माध्यमातून जाता येते असे शिरसाट म्हणाले. बाकीची इतर खाती तर ग्राऊंड लेवलशी तुमचा संपर्क तुटलेला असतो. या खात्यात दलित, पीडित हे वर्ग आहेत, त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद असतो असे शिरसाट म्हणाले.

मला अलिकडे जास्त बोलूच नये असे वाटतं

मला अलिकडे जास्त बोलूच नये असे वाटतं आहे. बोलल्यामुळं त्रास होतो असे संजय शिरसाट म्हणाले. पण चॅनेलवर दिसणे इतके सोपे नसते. तेवढे दुश्मन आपण तयार करत असतो असे शिरसाट म्हणाले. संजय राऊतला आजही मी दोस्त आहे असं म्हणतो, त्याला दुश्मन आहे असं म्हणत नाही. मी कुणालाच दुश्मन मानत नाही. काही लोकांना कितीही सांभाळून ठेवलं तरी ते सकाळी भुंकणारच आहे असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावला.

https://www.youtube.com/watch?v=_qichcu0dj8

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Shirsat : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार का? माझा कट्ट्यावर मंत्री संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.