राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीची इनसाईड स्टोरी, ‘दादू’ला सरप्राईज, नक्की काय घडलं?

राज थाके यांनी मातोश्रीला भेट दिली: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरुन गेली का, असे वाटू लागले होते. परंतु, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी सर्वांनाच सुखद धक्का देत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. ठाकरेंच्या गोटात कोणीही तशी अपेक्षा केली नव्हती. मात्र, रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जायचे, हे ठरवले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊत यांना कॉल लावला. ‘मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे’, असे सांगितले. संजय राऊत यांनी ही गोष्ट लगेचच उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानावरुन बाहेर पडले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटांत मातोश्रीवर पोहोचले.

Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी मातोश्रीवर येताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

राज ठाकरे हे उद्धव यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत आहे, ही बातमी बाहेर येताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले. राज ठाकरे यांची गाडी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आली तेव्हा त्यांच्या गाडीला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला. हे कार्यकर्ते राज ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र‘ करताना दिसले. इतक्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज यांना घेण्यासाठी गेटच्या बाहेर आले. राऊत हे राज ठाकरे यांना मातोश्रीच्या गेटपर्यंत घेऊन गेले. एरवी उद्धव ठाकरे हे कोणाच्याही स्वागतासाठी मातोश्रीच्या गेटपर्यंत येत नाहीत. मात्र, राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीच्या गेटवर उभे होते. रा ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मिठी मारली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात लालभडक गुलाबांचा मनमोहक पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

https://www.youtube.com/watch?v=vsign5nyh3W

आणखी वाचा

राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं, उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, पण फक्त 20 मिनिटांत राज बाहेर पडले

आणखी वाचा

Comments are closed.