नवऱ्यावर इतके गंभीर आरोप झालेत, रोहिणी खडसेंनी राजीनामा द्यायला हवा; विरोधकांचा पहिला वार
पुणे क्राइम रेव्ह पार्टी: पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर (Rave Party) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रोहिणी खडसे यांच्या पतीचे नाव समोर येताच खडसेंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. नवऱ्यावर इतके गंभीर आरोप झालेत, रोहिणी खडसेंनी राजीनामा द्यायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.
रोहिणी खडसेंनी राजीनामा द्यायला हवा
चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांना स्वतःला असे वाटले पाहिजे की, आता माझ्या पतीवर इतके गंभीर आरोप झाले आहे. तर मी लगेच राजीनामा दिला पाहिजे. आपल्या पक्षाचे नुकसान व्हायला नको. कारण पक्षाचा फायदा आणि पक्षाचे नुकसानी सर्वात पहिले असते. त्यामुळे त्यांनी सर्वात पहिले त्यांनी राजीनामा द्यावा द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तुमचा कोर्टावर विश्वास आहे. कारण तुम्ही म्हणता की ईडीमध्ये महाराष्ट्र राज्यात किंवा देशात कोणालाच जामीन मिळाला नाही. पण कोर्टाने तुम्हाला जामीन दिला. म्हणजे तुम्हाला न्याय दिला आहे. हे प्रकरण कोर्टात जाईल तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल. परंतु तोपर्यंत राजीनामा द्यायला हवा, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना लागवलाय.
एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी देखील भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी आमची अपेक्षा आहे. जावई असो किंवा अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=9l8at08yvsu
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.