अजितदादांची गाडीतून उतरताच चाणाक्ष नजर पोलीस अधिकाऱ्याच्या पायाकडे गेली, म्हणाले, ‘लेस लावा…ल
अजित पवार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच राहुरीतील तनपुरे कुटुंबीयांच्या घरी सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि अरुण तनपुरे यांच्या राहत्या घरी झालेल्या या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीदरम्यान अजितदादांची चाणाक्ष नजर आणि मिश्किल स्वभाव यांचेही दर्शन उपस्थितांना झाले.
तनपुरे वाड्यावर पोहोचल्यानंतर उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बुटाची लेस नजरेस आली. दौऱ्याच्या गडबडीत ती लेस खुली राहिली होती. अजित पवारांचे गाडीतून उतरताच पोलीस अधिकाऱ्यांच्या बुटावर लक्ष गेले. त्यांना तत्काळ “लेस लावा… लेस लावा…” अशा सूचनांद्वारे पोलीस अधिकाऱ्याला सजग केलं. त्यांच्या बारकाईने पाहण्याच्या सवयीचा हा छोटासा प्रसंग उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला. त्याचप्रमाणे, प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा सोहम याची उंची पाहून अजित पवारांनी मिश्किलपणे विचारलं, “आणखी किती उंच होणार?” यावर सर्वत्र हास्याचं वातावरण निर्माण झालं होतं.
अजित पवारांचं प्राजक्त तनपुरे आणि प्रसाद तनपुरे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसाद तनपुरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि “काळजी घ्या,” अशी विनंती देखील केली. या भेटीनंतर अजित पवार यांच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकरी मेळाव्यानंतर हा विशेष दौरा ठरला. अजित पवार यांच्या या भेटीमुळे शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्याची चर्चा आता राहुरीत रंगली आहे.
जनतेसाठी मी काम करतो : अजित पवार
दरम्यान, राहुरी शहरातील बाजार समिती आवारात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, आमच्या पक्षाची वाटचाल शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर सुरू आहे. 2025 मध्ये काम करत असलो तरी त्यांचे विचार राज्याला व देशाला मजबूत करणारा विचार आहे. विधानसभेत चांद्यापासून बांद्यापर्यंत महायुतीला पाठबळ मिळाले. जनतेने त्यांचे काम केले आता जनतेला दिलासा कसा देता येईल, असे काम आम्ही करतोय. राहुरीचे सुपुत्र अरुण तनपुरे यांनी पक्षात प्रवेश केला. माझ्या कामाची सुरुवात सकाळी लवकर होते. इतक्या सकाळी कोणी बाहेर पडत नाही. वाहिन्यांवर कधी-कधी एक वाक्य पकडून बातम्या करतात. मात्र, ते सगळे माझे कार्यकर्ते आहेत. मी माझ्यासाठी सूचना करत नाही जनतेसाठी मी काम करतो.
बाजार समितीबाबत कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला जाईल : अजित पवार
माझा जन्म देवळाली प्रवरा गावचा आहे. माझं आजोळ या जिल्ह्यात असल्याने माझं इथे लक्ष असते. बाजार समितीबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला जाईल. राहुरी बाजार समितीत वीस रुपयात जेवण दिले जाणार आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना तुमच्यासाठी महत्वाचा आहे. माळेगावचे चेअरमनपद मला घ्यावे लागले. यंदाही महाराष्ट्रातील सर्वाधिक उसाला भाव मी देणार आहे. मी चेअरमन मात्र कारखान्याची गाडी वापरत नाही. ती संस्था शेतकऱ्याच्या मालकीची आहे. काटकसरीने संस्था चालवाव्या लागतात. राहुरी साखर कारखाना देखील चालवायला घ्या अस मला अनेकजण म्हणाले. आम्ही भाषण करून तुमची पोट भरणार नाही. त्यासाठी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. चुकीचे समर्थन मी करत नाही. एकदा समजून सांगेल दोनदा सांगेल. मात्र इजा, बिजा, तिजा झाल्यावर सहन करू शकत नाही. मी आधी खासदार झालो नंतर अनेक पदे मिळाली. यावेळी काहीजण म्हणत होते दादांचे काही खरं नाही. मात्र बारामतीकरांनी एक लाखाचे लीड दिले, असे अजित पवार यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.