दुकानं बंद, रस्ते शांत; दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावपूर्ण शांतता, जमावबंदीचे आदेश लागू, पोलिस

दौंड: दौंड तालुक्यातील यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. जमाबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केले आहेत, तर ज्यांनी काल दगडफेक केली. जाळपोळ केली, त्यांना पोलीस आयडेंटिफाय करून ताब्यात घेत आहेत. यवतची आज बाजारपेठ बंद आहे. यवत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांची गाडी देखील गावातून जमाव बंदीचा आदेश असल्याचे सांगत आहे. काल (शुक्रवारी, ता-1) झालेल्या तणावानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतलं आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत यवत गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तसेच बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे.

नेमकं काय प्रकरण?

दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारानंतर यवतमधील दोन गट आमनेसामने आले होते. यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असल्याची माहिती आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला. यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. काल पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी गावातील महिला आणि लहाण मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे. आज शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

पोलीस नेमकं काय म्हणाले?

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी एबीपी माझाशी संवाद साधून काल (शुक्रवारी) संपूर्ण घटनेची माहिती दिली. यवत गावात जी घटना घडली, ती  एका सोशल मीडिया स्टेटसमुळे घडली. फेसबुक आणि व्हाट्सअॅप स्टेटस लावण्यात आलेला होता. एक तरुणांने हे आक्षेपार्ह स्टेटस लावल्यामुळे हा प्रकार घडला. ज्यावेळी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली, त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनला घेऊन गेले मग नंतर त्याच्यावर कारवाई सुरू केली.

पोलिसांनी गावातील प्रतिनिधींची मीटिंग घेतली होती. परंतु त्यादरम्यान आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. गावात तणाव होता, लोक रस्त्यावर आले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आमची पेट्रोलिंग त्या ठिकाणी चालू होती, ज्या ज्या ठिकाणी काही तणावची परिस्थिती होती, त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तणाव दूर केला.  आता गावात  पूर्णपणे शांतता आहे आणि कुठलाही प्रकारचा जमाव कुठे नाही.  पोलीस बंदोबस्त आणि पोलीस पेट्रोलिंग चालू आहे. सर्व नागरिकांनी शांतता राखावी, कायद्याचं उल्लंघन करु नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन संदीप गिल यांनी केलं.

https://www.youtube.com/watch?v=y6zi7er_gcw

आणखी वाचा

Comments are closed.