तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात? अटक करून दाखवाच, या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर

राज ठाकरे: शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी दिलेल्या निमंत्रण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी संजय राऊत आणि राज ठाकरे यांना रॅलीसाठी निमंत्रण दिले होते. दरम्यान मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याने वर्धापन दिनाला बोलावलं असल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही, राज ठाकरे गरजले, त्याचबरोबर त्यांनी जनसुरक्षा कायद्यावरतीही भाष्य केलं आहे.

अटक करून दाखवाच…

राज ठाकरे म्हणाले, सर्व जमिनी आणि याच्यावरती काय तर म्हणे राज्य सरकारने कायदा आणला आहेत. तुम्ही कोण आहात तर तुम्ही अर्बन नक्षल आहात. शहरांमध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर कशाला विरोध केला, कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते, एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग इथे आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला ते आणता येणार नाहीत. कोण कुठे येतो आणि काहीही करतो, पत्ताच लागत नाही. या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती आहेत. का? तेच ठरवणार का? आणि रस्ता व्हायच्या आधीच तेच
तिथल्या जमिनी घेणार आणि मग या सर्व उद्योगपतींची व्यवहार करणार आणि निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला गप्प बसवणार.   विषय गेला बाजूला, विचार केला बाजूला, तुमच्या तोंडावरती फक्त पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडून मत घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कोणी खोलात जाऊन बघायला तयार नाही. कोणी खोलात जाऊन विचार करायला तयार नाही. याच्यापुढे आपलं काय होणार असे पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो

महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करत आहे, बाहेरून येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही. मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग राज ठाकरे बोलतो तेव्हा संकूचित कसा? अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या हिंदी सक्तीवर प्रहार केला.

https://www.youtube.com/watch?v=c_1hdprji-g

आणखी वाचा

Comments are closed.