महिलेला फसवलं अन् शरीरसंबंध ठेवले; दोनदा गर्भपात, खुनाचाही आरोप, पुणे पोलिसांनी रात्री तीन वाजत

पुणे : पुण्यात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या (Pune Crime News) गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तीन रात्री जागून वीसपेक्षा अधिक सोसायट्यांच्या पार्किंगची तपासणी करून आरोपीची गाडी शोधली आणि सापळा लावून त्याला पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. विशाल लक्ष्मण भोले (वय 32, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याच्या आरोपावरून विशाल लक्ष्मण भोले यांच्यावरती 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने लग्न झाले नसल्याचे सांगून महिलेला फसवले होते. महिलेसोबत संबंध ठेवले त्यानंतर तिला जबरदस्तीने दोन वेळा गर्भपात करायला भाग पाडले. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगला थिएटरसमोर 2023मध्ये झालेल्या एका खूनाच्या प्रकरणातही विशाल भोले हा मुख्य संशयित आरोपी आहे. गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी दोन वर्षांपासून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. मात्र, तो सापडला नव्हता. आता त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं आहे.(Pune Crime News)

‘सीसीटीव्ही’ तपासत पोलिस पोहोचले धायरी अन्…

पोलिस आरोपीचा शोध घेत असताना विशाल भोले ताडीवाला रस्ता परिसरात मित्राला भेटून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयित आरोपी हा निळ्या रंगाच्या मोपेडवरून जाताना दिसला. पोलिसांनी ताडीवाला रस्त्यापासून आरोपीचा माग काढायला सुरूवात केला. धायरीतील धायरेश्वर मंदिरापासून काही अंतरापर्यंत आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत होता. मात्र, त्यानंतर सीसीटीव्हीची साखळी तुटली. त्यात आरोपी दिसेनासा झाला. त्यानंतर पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केली

सोसायटीत दिसली ती निळ्या रंगाची मोपेड

जिथे साखळी तुटली तिथपासून पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केली. संबंधित रस्त्यावर पुढे 20 ते 25 सोसायट्या होत्या. आरोपी याच सोसायटीत कुठेतरी तरी राहत असावा, अशा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आरोपीची निळ्या रंगाची मोपेड दिसते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार 29 जुलैला मध्यरात्रीनंतर त्यांनी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये गाडी शोधण्यास सुरुवात केली. 31 जुलैला मध्यरात्री एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये संशयित निळी मोपेड दिसली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. आरोपीला व्यायामाची आवड होती. तो पहाटेच व्यायामासाठी बाहेर पडायचा. त्यानुसार पहाटे साडेचार वाजता तो बाहेर आला असता, पोलिसांनी त्यला ताब्यात घेतलं.

आणखी वाचा

Comments are closed.