जीवे मारण्याची धमकी देत दुसऱ्या गावात घेऊन गेला; 20 वर्षीय तरुणीवर केले अनेकदा अत्याचार, वाशिम
वाशिम : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला अहिल्यानगर येथे नेत दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून जऊळका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तनुज गौरकार याला अटक करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी या गावात ठेवलं
एप्रिल महिन्यात आरोपीने या तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी या गावात ठेवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरिरसंबंध ठेवले, अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पिडीत तरूणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गावामध्ये एका रूममध्ये ठेवलं, तिच्या इच्छेविरोधात…
याप्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश हिवरकर यांनी माहिती देताना सांगितलं की, वाशिम येथे दिनांक 1 ऑगस्ट रोजी याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरूणीने आमच्याकडे फिर्याद दिली आरोपी तनुज गौरकार याने पिडीतेला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावरती अहिल्यानगरमधील गावामध्ये एका रूममध्ये ठेवलं, तिच्या इच्छेविरोधात वारंवार अत्याचार केले, त्यानंतर पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.