अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटने
वाशिम : वाशिममधील गोगरी परिसरात मनरेगा योजनेच्या अंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याबाबत शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण (Washim Farmer News) केल्याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल (Washim Farmer News) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचं त्यांचं म्हणण आहे. यादरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणी करण्यासाठी गेले असता, पवार यांनी त्यांच्याकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. आरोपानुसार, जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत चक्क बुटाने मारहाण केली. याशिवाय, शेतातील मातीची ढेकळे उचलूनही पवार यांना मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Washim Farmer News)
तुला गुन्ह्यात अडकवतो अशी दिली धमकी
या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘तुला गुन्ह्यात अडकवीन’ अशी धमकी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी संघटनांचे पदधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
वाशिममध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषी अधिकाऱ्यांचा प्रताप; राज्यभरात संताप #व्हायरल व्हिडिओ #वाशिमन्यूज pic.twitter.com/weNAHKpgA1
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 14 जानेवारी 2026
तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण होत असल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे. ऋषिकेश पवार असे तरुण शेतकऱ्याचे, तर सचिन कांबळे असे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, खेर्डा बु. खुर्डा खु. येथील शेतकरी फळबाग गटापासून वंचित असल्याची तक्रार शेतकरी ऋषिकेश पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. गावातील आणि परिसरातील १५ फळबाग उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांचे रोजगार हमी योजनेंतर्गत गट काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे नवनियुक्त कृषी सहाय्यक रुजू झाल्यापासून फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागले आहे, हे अन्यायकारक असल्याचा आरोप तक्रारीत त्यांनी केला होता. शेतकऱ्यांचे प्रलंबित गट तत्काळ काढून देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला.
शेतकऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, कृषी सहाय्यक कृषी विभागाने इतर अधिकारी व कर्मचारी मंगळवारी गोगरी गावात दाखल झाले होते. यावेळी ते एका शेतात फळबागेची पाहणी करून शेतकऱ्याशी चर्चा करीत होते. यावेळी ऋषिकेश पवार यांनी त्याचे व्हिडीओ केले. त्यावर तालुका कृषी अधिकारी संतापले.
त्यावेळी शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. कृषी अधिकाऱ्यांनी रागाच्या भरात पायातील बुट काढून शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेले. बुटाने शेतकऱ्याला मारण्यास सुरुवात केली. असे व्हिडीओमध्ये दिसून येत असून सोशल मिडीयावरती ती चांगलीच व्हायरल होत आहे. हे प्रकरण मंगरुळपीर पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्ही बाजूने हे प्रकरण आपसात मिटवण्यात आल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.