युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं, फॅमिली फोटोसे
मुंबई: मुंबईमध्ये आज शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला. या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात कुटुंबातील प्रमुख सदस्य एकत्र आले होते. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. हा साखरपुडा मुंबईत पार पडला. या सोहळ्यामुळे पवार कुटुंबातील एकोपा पुन्हा एकदा दिसून आला. युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींच्या साखरपुड्याचे फोटो सध्या समोर आले आहेत.
जय पवार यांचा मोठ्या थाटामाटामध्ये पुण्यात साखरपुडा
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा मोठ्या थाटामाटामध्ये पुण्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा सारखपुडा पार पडला आहे. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. युगेंद्र पवार हे तरुण नेते म्हणून राजकारणात सक्रिय असून सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. तर तनिष्का कुलकर्णी याही शिक्षित असून त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत दिलखुलास असल्याचे सांगितले जाते.
मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत आज 3 ऑगस्ट रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले आहे. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी अजितदादांविरोधात शड्डू ठोकले होते. या निवडणुकीत अर्थातच अजितदादांचा अनुभव कामी आला. पण कौटुंबिक आणि राजकीय हितसंबंध एकत्र करण्याची गल्लत पवार कुटुंबीय करत नाही ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. आज मुंबईत होणाऱ्या साखरपुड्यानिमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत.
पवार कुटुंबात अनेक वर्षांनंतर असा सलग दुसरा साखरपुडा सोहळा होत आहे. यापूर्वी जय पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. आजचा सोहळा देखील पवार कुटुंबाला एकत्र आणणारा ठरणार आहे. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंग हे तनिष्का कुलकर्णी यांचे निवासस्थान असून, या ठिकाणी हा समारंभ साजरा होणार आहे. पवार कुटुंबातील हा आनंदाचा क्षण त्यांच्या समर्थकांसाठीही उत्साहवर्धक आहे, कारण यामुळे कुटुंबातील एकता आणि बंध पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=1_xsydvjxv4
आणखी वाचा
Comments are closed.