कोथरुड पोलिसांनी तिन्ही तरुणींना कोठडीत छळलं, पण एका स्टेटमेंटमुळे पोलिसांची माघार
पुणे गुन्हेगारी दलित मुलींनी कोथरुड पोलिसांनी छळ: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या मुलींनी कोथरुड पोलीस (Kothrud Police) आणि छत्रपती संभाजीनगर ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्वांनी कोथरुड पोलीस ठाण्यात आमचा चार तास छळ केला, असा आरोप या तरुणींनी केला आहे. या मुलींसोबत असणारी विवाहित महिला तिच्या घरातून पळून आली होती. तिने एका दिवसासाठी या मुलींच्या कोथरुडमधील फ्लॅटवर आसरा घेतला होता. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati sambhaji nagar) पोलिसांना या विवाहित तरुणीचे मोबाईल लोकेशन कोथरुडमध्ये आढळून आले. त्यानंतर कोथरुड आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कर्मचारी या मुलींच्या फ्लॅटवर आले होते. याठिकाणी झाडाझडती घेऊन या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
मात्र, कोथरुड पोलीस ठाण्यात या मुलींची चौकशी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कर्मचारी आणि माजी पोलीस असलेल्या सासऱ्यांना रिकामी हाती माघारी फिरावे लागले होते. या विवाहित मुलीने कोथरुड पोलीस ठाण्यात आपल्याला सासरच्या मंडळींकडून त्रास होतो, असा जबाब दिला होता. मी स्वेच्छेने पुण्यात आल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक रिकाम्या हातांनी माघारी परतले होते. या विवाहित मुलीच्या सासऱ्यांना त्यांच्या सूनेला परत नेता आले नव्हते.
या मुलीचे अक्षय सानप यांच्याशी दीड वर्षापूर्वी लग्न झाले होत. अक्षयचे पूर्वीही एक लग्न झालेले आहे. पीडित मुलीचे फाईन आर्टचे मुलिचे शिक्षण झाले आहे. सदरील मुलीचे सासरे हे दीड वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी नगर पोलिसातून पीएसआय पदावर रिटायर झालेले आहेत. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून मुलीने घर सोडल्यानंतर ती एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील काही मुलींच्या संपर्कात आली. ती या मुलींना फोन करून पुण्यात गेली. दोन दिवस ही मुलगी या मुलीच्या संपर्कात होती. नंतर ही मुलगी एका संस्थेत गेल्याचे समजते.
Pune Crime: पोलिसांनी रिकाम्या हातांनी माघारी का परतावे लागले?
छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल होती. या प्रकरणात सातारा पोलीस तपास करत होते. यावेळी मिसिंग महिला पुण्यात असल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच गुन्हे शाखा आणि सातारा पोलीस असं पथक महिलेच्या शोधात शुक्रवारी पुण्याकडे रवाना झाले. ज्यात एक पोलीस उपनिरीक्षक दोन पुरुष कर्मचारी आणि महिला कर्मचारी पथकात होते. गुरुवारी मध्यरात्री निघालेलं पथक शुक्रवारी सकाळीच पुण्यात पोहोचले. त्यानंतर कोथरुड पोलिसांकडून कायदेशीर मदत घेण्यात आली. यावेळी पुणे पोलिसांच्या दामिनी पथकासह छत्रपती संभाजीनगर पोलीस महिला राहात असल्याची माहिती मिळालेल्या ठिकाणी पोहचले. यावेळी तिथे काही तरुणी उपस्थित होत्या.
त्यावेळी या मुलींकडे मिसिंग असलेल्या महिलेची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मिसिंग महिला ही महिला व बाल कल्याण वसतिगृहात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस वस्तीगृहात पोहोचले आणि त्याठिकाणी मिसिंग महिला मिळून आली. या महिलेला कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, आणि तिचा जबाब घेण्यात आला. यावेळी या महिलेने सासरच्या मंडळीकडून मला त्रास दिला जात असल्याचे सांगत मला पुन्हा परत यायचं नाही असं पोलिसांना जबाब दिला. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर पोलिसांचे पथक पुन्हा माघारी आल्याचे सांगितले जाते.
https://www.youtube.com/watch?v=rc3xppxfhfi
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.