आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरातील धक्
छत्रपती संभाजीनगर: आईने मोबाईल का दिला नाही ? या क्षुल्लक कारणावरून अवघ्या 16 वर्षांच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपला आयुष्य संपवण्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय . शहरा जवळील खवड्या डोंगरावरून तरुणांना उडी घेतल्याने त्याचा जागेच मृत्यू झाला .गेल्या काही दिवसांपासून अशाच कारणांमुळे घडलेल्या आत्महत्यांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे . (Sucide News)
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये “आईने मोबाईल का दिला नाही?” या क्षुल्लक कारणावरून तब्बल 16 वर्षांच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलय. शहराजवळील खवडया डोंगरावर ही घटना घडली आहे. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आईने “सध्या मोबाईल घेऊ नको” असं स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला होता. आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवडया डोंगर गाठला आणि उंचावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
मुलांच्या भावना समजून घ्याव्यात: पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी
या प्रकारानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी अपील केलं आहे की, पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. “मुलांमध्ये आलेली अस्थिरता, निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. पालकांनी संवाद वाढवावा, मुलांच्या भावना समजून घ्याव्यात,” असं ते म्हणाले.
दरम्यान, मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांचेही मत अधिक गंभीर आहे. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचे आकर्षण इतकं प्रचंड वाढलं आहे की, मानसोपचार विभागात येणाऱ्या दहा केसेसपैकी नऊ केसेस या मोबाईलशी संबंधित असतात. मोबाईल मिळत नाही म्हणून मुले नैराश्यात जातात, चिडचिड करतात आणि काही वेळा जीवघेणं पाऊल उचलतात.”
मानसोपचार तज्ञ काय सांगतात?
डॉ. शिसोदे पुढे सांगतात, ..मुलांना या वयात राग अनावर होतो, आजूबाजूला सगळ्यांकडे मोबाईल आहे मग माझ्याकडे का नाही माझे पालक मला का देत नाही असा विचार त्याच्या मनात येतो आणि त्यातून ते असले धोकादायक निर्णय घेऊ शकतात त्यामुळे पालकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे .“या वयात मुलांमध्ये राग अनावर होतो. त्यांना वाटतं, ‘सगळ्यांकडे मोबाईल आहे, मग माझ्याकडे का नाही?’ या असंतोषातून त्यांचं विचार करणं बंद होतं आणि ते धोकादायक निर्णय घेतात. म्हणूनच पालकांनी कठोरपणा न दाखवता संवादातून मार्ग शोधावा.”
आणखी वाचा
Comments are closed.