पिच्चरमध्ये काम देतो म्हणून मुली जाळ्यात ओढल्या; लोणावळा, साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन, ख

पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रांजल खेवलकर यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचं चित्र आहे. पोलिस तपासांमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खेवलकर याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अश्लील फोटो आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पार्ट्यांमध्ये महिलांना नशा करवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर महिलांना पिच्चरमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत होते. आणखी काही गोष्टी तपासामध्ये उघड होत आहेत. मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अरूष नावाच्या एका व्यक्तीचा यातील सहभाग उघड होत असल्याची माहिती देखील रूपाली चाकणकरांनी दिली आहे, यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची चर्चा आहे.

काही महिलांशी चॅटिंगही केल्याचंही समोर आलं आहे. पीडितांमध्ये मोलकरणींचाही समावेश आहे, अशी माहिती चाकणकरांनी दिली. या प्रकरणाचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. चाकणकरांनी माहिती देताना सांगितले की, खेवलकर याने एकूण 28 वेळा त्या हॉटेलमध्ये खोली बुक केली असल्याची तक्रार आयोगाकडे आली होती. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रकरणाच्या तपासाबाबत आयोगाने पत्र दिले आहे.

खेवलकरच्या मोबाइलमध्ये 1749 नग्न फोटो आणि व्हिडीओ

खेवलकरच्या मोबाइलमध्ये हिडन फोल्डरमध्ये एकूण 1749 नग्न फोटो आणि व्हिडीओ असून, त्यामध्ये 234 फोटो आणि 29 व्हिडीओ अत्यंत अश्लील आहेत. ही फोटो आणि व्हिडीओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. महिलांना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात ते पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत होते. आणखी काही गोष्टी तपासामध्ये उघड होत आहेत.

कोण आहेत प्रांजल खेवलकर?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.