ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम महागात पडलं, ‘शावी’च्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून 9 कोटींची फस
मुंबई : 80 व्या वर्षी ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम चांगलेच महागात पडले. प्रेम आणि खोट्या सहानभूतीच्या नावाखाली या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 9 कोटी रुपयांना गंडवले.एकाच वेळी नाही तर या ना त्या कारणाने तब्बल 734 आर्थिक व्यवहार केल्यानंतर ही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे
खरंतर, एप्रिल 2023 मध्ये त्या वृद्ध माणसाने फेसबुकवर ‘शावी’ नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. सुरुवातीला तिने ती नाकारली, पण काही दिवसांनी त्याच शावीने पून्हा रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये फेसबुक चॅट होऊ लागले. नकळत दोघांमधील मैत्री आणखी घट्ट होत गेली. दोघांचा व्हॉट्स अप संवाद सुरू झाला
शावीने स्वतःची ओळख करून देताना ती घटस्फोटित असून दोन मुलांची आई असल्याचे सांगितले. तसेच कौटुंबिक त्रास आणि ती आर्थिक संकटात असल्याची माहिती तिने नागरिकाला दिली. कालांतराने विविध कारणे देत तिने ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली. दोघांमधील अश्लील चॅटचा गैरफायदा घेऊन कालांतराने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्याकडून टप्या टप्याने 9 कोटी रुपये उकळण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला वडिलांच्या व्यवहारावर संशय आल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले
आपली फसवणूक झाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकाला मिळाल्यानंतर त्याला याचा चांगलाच धक्का बसला. 22 जुलै 2025 रोजी या प्रकरणी सायबर पोलिसात ज्येष्ठ नागरिकाने तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे 6 ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
22 महिन्यात 9 कोटी रुपये गमावले
ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी महिलेचं नाव वापरुन त्याशिवाय कौंटुबिक आर्थिक कारणं सांगत वेळोवेळी पैसे पाठवण्यास भाग पाडलं. सायबर चोरट्यांनी महिलेचं नाव वापरुन ज्या बँक खात्यांची माहिती पाठवली त्या खात्यावर संबंधित व्यक्तीनं पैसे पाठवले. जवळपास 22 महिने हा प्रकार सुरु होता. या 22 महिन्यात तबब्ल 734 व्यवहारांद्वारे ही रक्कम सायबर चोरट्यांनी मिळवली. अखेर पैसे संपताच संबंधित ज्येष्ठ नागरिकांनं मुलाला पैसे मागितले. त्यांच्या मुलानं वडिलांकडे 9 कोटी रुपये होते मात्र ते का पैसे मागत आहेत असं विचारलं असता ज्येष्ठ नागरिकानं घडलेली सगळी घटना मुलाला सांगितली. त्यानंतर मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरताना नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे.सोशन मीडिया वापरताना अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट देखील स्वीकारु नये. याशिवाय फोनवरुन कोणी ओटीपी किंवा पासवर्ड विचारल्यास तो शेअर करु नये.
आणखी वाचा
Comments are closed.