देवेंद्र फडणवीसांनी आता शरद पवारांना घेरलं, घरी आलेल्या ‘त्या’ दोघांबाबत वेगळाच संशय, म्हणाले..
शरद पवार वर देवेंद्र फड्नाविस: राज्यातील 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन लोक आपल्याला भेटायला आले होते. या लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांचा दावा म्हणजे सलीम-जावेदच्या गोष्टी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही सलीम जावेदची गोष्ट चालली आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? त्यामुळे मला वाटतं या सलीम-जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.
गोळा डागा अन् पळून जा हीच रणनीती
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आता हे गंभीर होत चाललंय की, हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्परंसी तयार करत आहे आणि एकमेकांना भेटून देत आहे. माझी अपेक्षा होती की, हे देशातले मोठे नेते आहेत. कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पोलिसांना कळवायला हवं. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. कारण निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं चार वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना ओपन चॅलेंज दिले आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणीही ईव्हीएम हॅक करू शकले नाही. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीवर इकडे-तिकडे बोलत आहेत. पण, निवडणूक आयोगाला समोर जायला तयार नाही. निवडणूक आयोग त्यांना पत्र देत आहे, नोटीस देत आहे, जाहीर निमंत्रण देत आहे. तिथे हे बोलत नाहीत. कारण मी यापूर्वी सांगितलं की, शूट अँड स्कूट गोळा डागा अन् पळून जा ही रणनीती यांची आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
शरद पवार खोटं बोलणार नाहीत : आदित्य ठाकरे
दरम्यान, शरद पवार यांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब हे खूप अनुभवी नेते आहेत. अनेक निवडणुका त्यांनी जवळून बघितल्या आहेत. त्यामुळे ते अशा विषयात खोटं बोलणार नाहीत. जे घडलं असेल त्यानुसार त्यांनी वक्तव्य केले असेल. या देशात अशा ऑफर्स येत असतील तर निवडणूक आयोगात गडबड असणार. निवडणूक आयोगाला वाटत असेल की, राहुल गांधी जर खोटं बोलत आहेत तर त्यांनी एका मंचावर यावे आणि आम्ही इंडिया आघाडीने जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर उत्तरे द्यावे. इकडून-तिकडून कशाला धमकावत आहात, हे देशाची जनता सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=1dyuuetfahw
आणखी वाचा
मंडल यात्रा म्हणजे नौटंकी, चंद्रशेखर बानकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, सत्ता गेल्यामुळं यांना काम नाही
आणखी वाचा
Comments are closed.