शरद पवारांनी त्या दोघांकडून प्रयोग करुन घ्यायला हवा होता;हसन मुश्रीफांचा पलटवार,गांधींवरही टीका

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या एका वाक्याने देशाच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून मतदार यादीतीली घोळ व बोगस मतदारावरुन आयोगाला आणि भाजपला लक्ष्य केले. त्यानंतर, निवडणुकांपूर्वी 2 लोकं आपल्याला भेटली होती, 160 जागा मॅनेज करुन देण्याचं ते बोलत होते, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावरुन, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गदारोळ उठला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता महायुतीमधील मंत्री हसन मुस्रिफ (हसन मुश्रीफ) आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी केलेल्या 2 अज्ञात व्यक्तींच्या वक्तव्यावरुन गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ही सलीम जावेदची गोष्ट चालली आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? त्यामुळे मला वाटतं या सलीम-जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, असे म्हणत फडणवीसांनी राहुल गांधी अन् शरद पवारांवर टीका केली. तर, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांना ज्या दोन व्यक्ती भेटून जातात त्यांचं नाव गाव पत्ता त्यांना माहीत असेल. ते ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्याचं मला आश्चर्य वाटतं, त्याचवेळी त्यांच्याकडून शरद पवार साहेबांनी प्रयोग करून घ्यायला हवा होता, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच, असं काही झालेलं नाही, शरद पवार साहेब गुगली टाकत आहेत, कथो कल्पित गोष्टी सांगून लोकांची फक्त मनोरंजन होईल, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.

बिहार निवडणुकांसाठी राहुल गांधींचा स्टंट

अनेक दिवसांपासून मत चोरी झालेली आहे, ती निवडणूक आयोगाने केली आहे, अशी तक्रार राहुल गांधी करत आहेत.  गांधी यांनी शपथपत्र देऊनही तक्रार करण्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, पराभव हा पराभव असतो, तो पचवण्यासाठी ताकद लागते. ज्यावेळी कच्च्या याद्या येतात, त्यावेळी लोक हरकती घेत असतात, कोल्हापुरातून एकही तक्रार आली नाही याचे हे उदाहरण आहे. राहुल गांधी विनाकारण देशाचा, संसदेचा आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत, त्यातून सिद्ध काही होणार नाही हा बिहार निवडणुकीसाठी राहुल गांधींचा स्टंट आहे, असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

राष्ट्रपतींकडे तक्रार केली पाहिजे – सामंत

शरद पवारांना अज्ञात लोक भेटली होती, त्यांची नावं त्यांना माहिती नाहीत. अस असेल तर त्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली पाहिजे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे वरातीमागून घोडं – प्रक्राश आंबेडकर

शरद पवार यांचा 160 जागा संदर्भांकथा हक्क म्हणजे वराती पाठीमागून घोडं असं आहे. आम्ही यापूर्वी या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टात जाऊ. त्यावेळी कोणीही आमच्या सोबत आलं नाही. कोर्ट एकमेव व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं. त्यावेळी त्यांनी ते केलं नाही. आता बोंबलत बसताजिवंतअशी परिस्थिती आहे.

हेही वाचा

योगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यावर उधळले पैसे, बनियन-लुंगी घालून आंदोलन; महायुतीच्या ‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार

आणखी वाचा

Comments are closed.