राज ठाकरेंविरोधात याचिका करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, सुनावणीस स्पष्ट नकार, नेमकं काय

राज ठाकरे: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी भाषेवरून वाद उफाळल्याचे दिसून येत आहे. मनेसेचे (MNS) पदाधिकारी काही हिंदी भाषिक किंवा अमराठी व्यापाऱ्यांना किंवा मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण करत असल्याचं सोशल मीडियातून समोर आलं आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठीच्या मुद्द्यावर मेळावा घेतला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत राज ठाकरे अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत, असा आरोप करण्यात आला होता. तसेच मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आली होती. आता राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, “ही याचिका केवळ प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आली आहे.” तसेच कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारत विचारले की, “तुम्ही हायकोर्टात का गेला नाहीत? उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का?” अशा शब्दांत कोर्टाने याचिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

हायकोर्टात जाण्याच्या सूचना

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, “या याचिकेवर सुनावणी करण्याची ही योग्य न्यायिक पातळी नाही. यासाठी याचिकाकर्त्यांनी आधी उच्च न्यायालयात दाद घ्यावी.” त्यामुळे याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य देत, सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका मागे घेण्याचे निर्देश दिले. परिणामी, याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. “विनाकारण कोणाला मारू नका, आधी समजवून सांगा. जर समोरचा व्यक्ती मराठी शिकायला आणि बोलायला तयार असेल, तर त्याला शिकवा. उर्मटपणाने वागणाऱ्यांशी वाद घालू नका. मात्र, जर कोणी उर्मटपणे बोलले, तर मग त्यानुसारच पुढची भूमिका घ्या, व्हिडिओ काढू नका” असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला होता.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde VIDEO : मुंडेसाहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं, फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत असा सल्ला दिला; पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले

आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पूजलेला; मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी, केली ‘ही’ मागणी

आणखी वाचा

Comments are closed.