‘माझी चूक पण, आई, कुटुंबाबद्दल…’, मित्रांना मेसेज केला अन् प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून विद
गोंदिया: गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यावर गोंदिया (Gondia Crime News) येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याने पाठवली. व्हाट्सअप ग्रुपवरील चिठ्ठी पाहताच मित्रांनी त्याच्या रूममध्ये धाव घेतली, आणि विद्यार्थ्याचे प्राण वाचविले.
चिठ्ठी वर्ग मित्रांनी बघताच तो राहत असलेल्या रूमवर त्यांनी धाव…
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील (Gondia Crime News) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या विद्यार्थ्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली व त्यानंतर गळफास घेतला. मात्र ती चिठ्ठी वर्ग मित्रांनी बघताच तो राहत असलेल्या रूमवर त्यांनी धाव घेतली, आणि त्याचे प्राण वाचविले. त्या चिठ्ठीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने त्या विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द बोलून विद्यार्थ्याचा छळ केल्याचे त्याने लिहिलेल्या त्या पत्रावरुन दिसून येत आहे. विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे.
प्राध्यापकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील भाड्याच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीनंतर 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आवेश कुमार (22, रा. भरतनगर, राजस्थान), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सिव्हिल लाइन्स परिसरातील शीतला माता मंदिर चौकात आवेश भाड्याच्या खोलीत राहत होता. याच खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हाताने लिहिलेली चिठ्ठी पोस्ट करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
चिठ्ठीत काय म्हटलंय?
वारंवार तक्रार करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्याने सांगितलं आहे. “मी स्वतः रुग्ण असून सहानुभूतीची अपेक्षा होती, मात्र मला अपमानास्पद वागणूक मिळाली. मी चूक केली, पण ती इतकी मोठी नव्हती की त्यासाठी माझ्या आई व कुटुंबाबद्दल नको ते बोलावं,” असे त्याने त्या पत्रात लिहिलं असून, संबंधित वर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या चिठ्ठीत त्याने एका प्राध्यापकाच्या नावाचाही उल्लेख केला आहे.आवेशचा हा व्हाट्सअॅप मॅसेज येताच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या खोलीवर धाव घेत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून काढून उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.