गोंदियातील बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टरचं टोकाचं पाऊल, स्वतःवर ब्लेड फिरवली अन्…
गोंदिया क्राईम न्यूज : गोंदिया (Gondia) येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ. नितेश बाजपेयी यानं उपचारासाठी आलेल्या एका गरीब दांपत्यांचं बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या 10 दिवसाच्या चिमुकलीची तीन लाखात भंडाऱ्यात (Bhandara Crime News) विक्री केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून आता यातील मुख्य आरोपी असलेले डॉ.नितेश बाजपेयी यानं आत्महत्या करण्याच्या उद्देशानं स्वतःवर ब्लेडनं वार केलाय.
मध्यप्रदेशच्या कटंगी येथून भंडाऱ्याकडे येत असताना हा प्रकार घडलाय. रात्रीच्या सुमारास तुमसर ते नाकाडोंगरी मार्गावर हा प्रकार घडलाहे. स्वतःच्या वाहनातून येत असताना डॉक्टरने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून हा प्रकार केल्याची बाब लक्षात येताच कारच्या चालकाने डॉक्टरला तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंहे. मात्र, प्रकृती अत्यवस्था असल्यानं तेथील डॉक्टरनं पुढील उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात रेफर केलंहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. फक्त या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
Bhandara Crime News : बाळ विक्री प्रकरणात आणखी एकाला अटक, आरोपींची संख्या पोहचली सहावर
गोंदिया येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ नितेश बाजपेयी यानं उपचारासाठी आलेल्या एका गरीब दांपत्यांचं 10 दिवसाचं बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात डॉक्टरच्या संपर्कातील एका महिलेला यापूर्वीचं अटक केली आहे. याचं डॉक्टरनं यापूर्वी डिसेंबर महिन्यात एका बाळाला भंडाऱ्यात विकल्याचा आणखी एक प्रकार तपासात समोर आला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आणखी एकाला गोंदियातून अटक केली आहे. त्यामुळं आता बाळ विक्री करणाऱ्या आरोपींची संख्या 6 झाली असून अटक झालेल्या आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. सागर सिक्का असं अटक केलेल्या आरोपीचं नावं असून त्याला गोंदियातून अटक केली आहे. डॉ नितेश बाजपेयी आणि त्यांच्या रॅकेटनं यापूर्वी डिसेंबर महिन्यात एका बाळाला भंडाऱ्यात विक्री केलं त्या प्रकरणात सागर सिक्का याला अटक केली आहे. आतापर्यंत बाळ विक्री प्रकरणी दोघांना अटक केली असून डॉक्टरसह अन्य तीन आरोपी फरार असून भंडारा पोलिसांचे दोन पथक त्यांच्या शोधार्थ रवाना केले आहे.
Crime : यांच्यावर आहेत दाखल गुन्हे
1) डॉ.नितेश बाजपेयी – गोंदिया
२) मालती वाघमारे – पांढराबोडी भंडारा
३) पौर्णिमा धुर्वे – गोंदिया
४) ललेश्वरी सादेपाच – गोंदिया
५) उमेश सिंग गेहलोत – गोंदिया
या पाच पैकी ललेश्वरी सादेपाच हिला पोलिसांनी अटक केली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.