पाण्याचं आमिष दाखवून विखे-पाटलांचं राजकारण, उद्धव ठाकरेंच्या आमदाराला सर्वांदेखत खुली ऑफर, म्हण

Radhakrishna Vikhe Patil : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी (Pravin Swami) हे अलीकडच्या काळात चर्चेत आले आहेत. लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भरसभेतच स्वामींना थेट महायुतीत प्रवेशाची ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

करजखेडा येथे झालेल्या जलसंपदा विभागाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या मतदारसंघातील पाणीप्रश्न आणि अन्य विकासकामांसाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती.

प्रवीण स्वामी यांना प्रवेशाची खुली ऑफर

त्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाषणात म्हणाले की, “तुमच्या मतदारसंघात पाणी आलं पाहिजे,  मात्र पाणी कोणत्या वळणावर हे तुम्हालाही कळलं पाहिजे, पाणी तर आम्हीच देणार,” असे त्यांनी म्हटले. यानंतर उपस्थित जनतेला उद्देशून विखे पाटील यांनी उपस्थितांना हातवर करून प्रवीण स्वामींना निर्णय घेण्याचे आवाहन केले. या ऑफरमुळे सभास्थळी आणि जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने महायुतीच्या मंत्र्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन पुकारले होते. त्याच दिवशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवीण स्वामी यांना ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रवीण स्वामी नेमका काय निर्णय घेणार?

काही आठवड्यांपूर्वीच शिवसेनेचे मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला होता. यावेळी सरनाईक आणि स्वामी यांच्यात वाढती जवळीक स्पष्ट झाली होती. यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवीण स्वामी यांना खुली ऑफरच दिली आहे. आता या पार्श्वभूमीवर प्रवीण स्वामी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांचे मनोज जरांगेंना दोन सवाल

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना दोन प्रश्न विचारले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का? मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, ही शरद पवारांनी जाहीर भूमिका मांडली. मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील का बोलत नाहीत? असे प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांना विचारले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

माणिकराव कोकाटेंना व्यक्तीस्वातंत्र्य देणार की नाही? मंत्री विखे पाटलांकडून रम्मी व्हिडिओची पाठराखण

आणखी वाचा

Comments are closed.