सरपंचाने गावकऱ्यांसोबत मोठा गेम, रेशन दुकानात कोऱ्या कागदावर सह्या घेऊन बिअर बारचा ठराव मंजूर

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील येणकी ग्रामपंचायत सरपंचाचा धक्कादायक कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. बियर बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायत ही घटना घडलीय .सरपंचांनी स्वतःच्या रेशन दुकानात येणाऱ्या लोकांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्याचे भासवलं आणि त्या आधारे बियर बार आणि परमिट रूमला मंजुरी घेतल्याचं समोर आलं .याप्रकरणी सरपंचाला आणि त्याला साथ देणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं आहे .

नेमकं प्रकरण काय ?

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतीत गावकऱ्यांची फसवणूक करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरपंच पोपट जाधव यांनी बिअर बार आणि परमिट रूम सुरू करण्यासाठी खोटी ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी कारवाई करत सरपंच जाधव यांना पदावरून बडतर्फ केले असून, त्यांना साथ देणाऱ्या ग्रामसेवकाला देखील निलंबित करण्यात आले आहे.

रेशन दुकानातून ‘कोऱ्या कागदांवर’ सह्या

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच पोपट जाधव रेशन दुकानात येणाऱ्या गावकऱ्यांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. नंतर या सह्यांचा वापर ग्रामसभेच्या ठरावासाठी केल्याचे दाखवण्यात आले. अधिकाऱ्यांना खोटा अहवाल सादर करून, ग्रामसभेत बिअर बार आणि परमिट रूम सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे भासवण्यात आले.

उपसरपंचाची तक्रार आणि चौकशी

या प्रकाराची माहिती मिळताच, येणकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आकाश खरात यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली असता, ग्रामसभेचे नोंदवहीतील तपशील आणि ग्रामस्थांच्या निवेदनात विसंगती आढळली. अनेक ग्रामस्थांनी ठरावासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई

चौकशीतून हे स्पष्ट झाले की, खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी कठोर पाऊल उचलत सरपंच पोपट जाधव यांना तत्काळ पदावरून बडतर्फ केले. तसेच या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामसेवकाचाही निलंबन आदेश काढण्यात आला.

ग्रामस्थांचा संताप

या घटनेमुळे येणकी गावात संतापाचे वातावरण आहे. ग्रामस्थ हरिभाऊ घुले यांनी सांगितले की, हे प्रकरण 2022 चे  आहे .नंतर या प्रकरणाची सुनावणी लांबली गेली .नंतर दक्षिण तालुक्याचे BDO, पियून यांनी व्यवस्थित माहिती काढून या घटनेची चौकशी केली त्यावेळी सरपंचाने मंजूर केलेला ठराव बोगस निघाला . त्यानंतर सरपंच निलंबित झाल्याचं गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी सांगण्यात आलं , येणकी गावचे ग्रामस्थ हरिभाऊ घुले यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा

Comments are closed.