ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोकच द्वेष पसरवताय, मी माफी मागायचा प्रश्नच नाही; भास्कर जाधवांनी स्पष्
भास्कर जाधव: गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar) आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या एका मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर जोरदार हल्लाबोल केला. भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली. ‘ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. मला परिणामांची चिंता नाही’, असे देखील त्यांनी म्हटले. यावरून ब्राह्मण समाज चांगला आक्रमक झाला आहे. आता यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, काल माझी मुंबईत बैठक झाली. ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी केला. मी कोणाची माफी मागायला पाहिजे? कशाची माफी मागावी? असं मी काय पाप केला आहे. ब्राह्मण सहाय्यक संघाने मला समाजाच्या वतीने पत्र द्यावे, मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मी कुठेही समाजाबाबत टीकाटिप्पणी केलेली नाही. मी समाजाबाबत कुठेही अवाक्षर बोललेलो नाही. भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाच्या लोकांना पुढे केलं आणि तुम्ही काही कारण नसताना माझ्या निषेधाचे पत्र लिहितात. मग मी तुम्हाला सोडेल का? मग माफी कसली मागायची? असे त्यांनी म्हटले.
भाषणाचा रोख गुहागरमधील ब्राह्मण समाजावरच
माझ्या कालच्या भाषणाचा रोख गुहागरमधील ब्राह्मण समाजावरच होता. जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही. ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिले? तुम्ही पक्ष म्हणून मला पत्र द्यायचे होते. समाजात द्वेष मी पसरवत नाही, हे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक पसरवत आहेत, असा हल्लाबोल देखील भास्कर जाधव यांनी यावेळी केला.
ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोकच द्वेष पसरवताय
भास्कर जाधव पुढे म्हणाले की, माझी सभा ही पक्षीय सभा होती. ती समाज म्हणून नव्हती. मी मराठा समाजात जन्माला आलेलो आहे. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही का? मराठा समाजाला काय मानसन्मान नाही का? अन्य समाजाला काय मानसन्मान नाही का? द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे, हे दिवस आता संपले आहेत. द्वेष पसरवण्याचे काम ब्राह्मण समाजाने गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीने पत्र देऊन केले. म्हणून मी सरळसरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रकाश महाजनांचा भास्कर जाधवांवर निशाणा
दरम्यान, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भास्कर जाधव यांच्यावर सोशल मिडीयावर पोस्ट टाकत निशाणा साधलाय. माननीय आमदार भास्करराव जाधव आपण आज ब्राह्मण म्हणजे पातळयंत्री असे म्हणून समस्त ब्राह्मण समाजाला दूषण लावले आहे. आपला वैयक्तिक राग काय आहे हा वेगळा विषय असू शकतो. पण, समस्त ब्राह्मणांना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले हे लोकप्रतिनिधी म्हणून आपणाला हे शोभत नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=tttrafe3lxs
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.