सांगलीत डिनर डिप्लोमोसी अन् बंद दाराआड चर्चा; पृथ्वीराज पाटलांनी शेवटी सोडला काँग्रेसचा हात, शह
सांगली: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीत काल (सोमवारी, ता 11) सायंकाळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट घेतली आणि जेवणाचा आस्वाद घेतला. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासोबतच्या डिनर डिप्लोमोसीची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे. यानिमित्ताने सांगलीत जयश्री पाटील यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
डिनर डिप्लोमोसीची चर्चा
काँग्रेसचे सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पृथ्वीराज पाटील हे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याची पृथ्वीराज पाटील यांनी ही घोषणा केली आहे. भाजपाचे दोन मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे काँग्रेसचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी भेटीस आले. या ठिकाणी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून बंद खोलीमध्ये चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश भाऊ खाडे, जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर बाहेर येऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समोर येवून आपली भूमिका मांडली. पृथ्वीराज पाटील यांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जाणार आहे, असं या नेत्यांनी जाहीर केलं आहे.
व्यक्त केली खदखद
तसेच सांगलीच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये पक्षप्रवेश करीत आहोत, असं पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी जाहीर केले. त्याचबरोबर आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय नक्की होईल असं दावा, यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी केला. पक्षांतर्गत बेदखलीमुळे पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पृथ्वीराज पाटील हे अस्वस्थ होते. एकनिष्ठ व दहा वर्ष कोणतेही पद नसताना केलेले काम याचे पुरेसे फळ मिळाले नाही, आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात किंबहुना त्यांच्या आदी प्रचारात जे झाले याचे शल्य त्यांना लागून राहिले आहे. त्याचीच परिणीती म्हणून भाजपच्या गळाला एक निष्कलंक, उत्तम उमेदवार आणि सहकारातील मोठे नाव व घराणे लागले आहे.
पक्षप्रवेशाची तारीख ठरली
पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. उद्या बुधवारी (13 ऑगस्ट) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. काँग्रेसचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत प्रवेश करणार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.