चुलतीला आय लव्ह यू म्हटल्याचा राग; हॉकी स्टीक अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण, जखमी अवस्थेत असताना..

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीत चुलतीला आय लव यू म्हणाल्याचा रागातून हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण (Pune Crime News) करत एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. 12 ऑगस्ट (मंगळवार) रोजी रात्री 8.30 वाजता ही घटना घडली आहे.साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

नेमकं काय घडलं?

चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्ती साईनाथ उर्फ खलबली दत्तात्रय जानराव असल्याचे समोर आले. त्याला दारूचे व्यसन असल्याचीही माहिती समोर आली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. (Pune Crime News)

लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण

अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपींची नावं समोर आली. मृत साईनाथ याने आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वालेकर याच्या चुलतीची छेड काढली होती. इतकंच नाही तर तो तिला आय लव्ह यू असं देखील म्हणाला होता. त्यामुळे आरोपींनी  त्याला लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साईनाथला त्यांनी तसंच सोडलं आणि ते निघून गेले. मात्र जखमी झालेल्या साईनाथचा मृत्यू झाला.

दरम्यान आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर यांनीच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांच्या तपासा दरम्यान त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीचा खून केल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1)3(5) अंतर्गत गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.