राज ठाकरेंना मंगलप्रभात लोढांचं उत्तर; त्या वक्तव्याबाबत केला खुलासा, म्हणाले, ‘मी त्यांच्या सम
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. तसेच दादरमधील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज (Jain Community) मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं दिसून आले. कबुतरखानाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले त्यावरती आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी
राज ठाकरेंना मंत्री मंगलप्रभात लोढांचे उत्तर
आता माननीय राज ठाकरे यांनी कबुतरांच्या विषयावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्यावरती बोलताना माझं नाव देखील घेतलं, मी त्यांच्या समर्थनामध्ये आहे असं, पण मी त्यांच्या समर्थनार्थ नाही, मी त्या दिवशी निलेशचंद्र यांनी जी भाषा केली होती.त्यावेळी मी सांगितलं होतं की मी त्यांच्या विरोधामध्ये आहे. आत्ताही माझं तेच मत आहे, म्हणून मी राज ठाकरेंसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो, कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हातात घेऊ नये, कोर्टाचे आणि प्रशासनाचे जे निर्णय आहेत, त्यांचे पालन करून काम करावे, असंही मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
कबुतरखाना संदर्भात न्यायालय व प्रशासनाचे आदेश पाळावे, कुणीही कायदा हातात घेऊ नये, मुनी निलेशचंद्र यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, असा खुलासा देखील लोढांनी केला आहे. राज ठाकरे व मुनी निलेशचंद्र यांच्या वक्तव्यानंतर मर्यादेत राहून आपली भूमिका मांडा असे आवाहन लोढांनी केलं आहे.
राज ठाकरे काय म्हणालेले?
राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=bedip3olvk4
आणखी वाचा
Comments are closed.