मुंबईत 81 वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; महिन्याभरात गमावले 8.70 कोटी रुपये
मुंबई : सायबर गुन्हेगार कोणाला, कधी आणि कुठे फसवतील याचा काही नेम नसतो. कित्येकदा फसवणुकीच हे सत्र महिनोंमहिने सुरूच राहत आणि फसवणूक झालेल्यांना (मुंबईतील सायबर गुन्हे) त्यांची कुणकुण देखील लागत नाही. असाच काहीसा प्रकार दक्षिण मुंबईतील एका महिलेसोबत झाला? एका महिलेच्या खात्यातून कोट्यवधीची रक्कम अचानक कंबोडिया देशात पाठवली जाऊ लागली. आयबी सारख्या केंद्रातील यंत्रणांना संशय आला आणि त्यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर शाखेला त्याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस महिलेच्या घरी दाखल झाले खरे पण महिला त्यांना खरे पोलीस मानण्यास तयारच झाली नाही.
मुंबईतील 81 वर्षीय या महिलेला (ज्येष्ठ नागरिक सायबर क्राइम इंडिया) 10 जुलैला अनोळखी नंबरवरून कॉल आला. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या या अनोळखी इसमाने ती महिला मनी लॉन्ड्रिंग करत असल्याचा दावा केला. महिलेचा विश्वास बसावा म्हणून कुलाबा पोलीस ठाण्याबाहेरील पोलिसांच्या वेशातील स्वतःचा व्हिडीओ देखील त्याने महिलेला पाठवला आणि महिलेला डिजिटल अटक (डिजिटल अटक घोटाळा) करून टाकली.
डिजिटल अटक (डिजिटल अटक) झालेली ही महिला या सायबर ठकाच्या पुरत्या जाण्यात अडकली होती आणि डिजिटल अरेस्टच्या भीतीने तिने स्वतःलाच स्वतःच्या घरात कोंडून घेतलं.
डिजिटल अटक घोटाळा: महिन्याभरात उकळले 8.70 कोटी रुपये
तेल कंपनीत उच्च पदावरून निवृत्त झालेल्या या महिलेकडे पैशांची काही कमी नव्हती आणि हेच या सायबर ठकांनी हेरल. त्या महिलेला वेगवेगळ्या कारणांनी धमकावून तिच्याकडून पैसे उकळू लागले. अवघ्या महिन्याभरात या सायबर गुन्हेगारांनी महिलेकडून 8.70 कोटींहून अधिकची रक्कम उकळली.
महिलेच्या खात्यातील पैसे जेव्हा संपले तेव्हा तिला तिच्या बँकेतील ठेवी, म्युचुअल फंड तसेच शेअर विकायला देखील त्यांनी भाग पाडलं. बँकवाले विचारतील तेव्हा दुबईत मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे उभे करतेय अस सांगण्यास देखील त्यांनी महिलेला बजावलं होत.
मुंबई सायबर फसवणूक: फ्रॉड कसा समोर आला?
ज्येष्ठ नागरिक असलेली महिला काही कारण नसताना अचानक कोट्यवधी रुपये कंबोडियात पाठवत असल्याने केंद्रातील आयबी सारख्या यंत्रणांना संशय आला? त्यांनी मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला.
मुंबई महिलेने सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली: पोलिसांना घराबाहेर उभं केलं
मुंबई पोलीस महिलेच्या घरी गेले पण ते पोलीस असल्याचं मान्य करण्यास महिला तयारच नव्हती. आज ना उद्या पोलीस महिलेच्या दारात येणार याची पूर्ण कल्पना या सायबर गुन्हेगारांना होती म्हणून त्यांनी आधीच महिलेला त्यांच्याविषय सांगून ठेवलं होत. आज ना उद्या पोलीस येतील, पण ते खरं पोलीस नसतील, आम्ही खरे आहोत. अस सांगून त्यांनी महिलेला भ्रमीत करून ठेवलं होतं. त्यामुळे जेव्हा पोलीस आले तेव्हा महिलेने त्यांना घरात घ्यायला स्पष्ट नकार दिला.
शेवटी पोलीस इमारतीच्या मालकाला घेऊन महिलेच्या घरी गेले. डिजिटल अरेस्टमध्ये सायबर फ्रेड ज्या मोडस ऑपरेंडी वापरतात ती त्यांनी महिलेला सांगितली. तेव्हा कुठे तिचा खऱ्या पोलिसांवर विश्वास बसला.
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणारे डिजिटल घोटाळा: महिलेचे खाते ब्लॉक केले
ती महिला आपल्याला खरे पोलीस मानत नाही हे ऐकून पोलीस देखील धास्तावले होते. मात्र महिलेची आणखीन फसवणूक होणे देखील पोलिसांना मान्य नव्हते. पोलिसांनी थेट 1930 या सायबर हेल्पलाईनवर फोन केला. त्यांना महिलेच्या खात्याचा क्रमांक दिला तसेच व्यवहार आयडी दिले आणि आधी महिलेची खाती ब्लॉक केली. अशा प्रकारे एखाद्याचे खाते पोलिसांनी स्वतः पुढाकार करुन ब्लॉक करणे ही पहिलीच केस आहे.
स्वतः च्या ठेवी, म्युचुअल फंड मधील रक्कम, शेअर मार्केटमधील रक्कम सायबर गुन्हेगारांना देणारी महिला आपलं रहात घर देखील विकेल याची पोलिसांना भीती होती. म्हणून पोलिसांनी स्वतःच तक्रार करत महिलेची सगळी बॅक खाती ब्लॉक केली.
अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून ज्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.