खळबळजनक! जे जे रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल, गरोदर महिला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत प
मुंबई गुन्हा: मुंबईतील जे जे रुग्णालयातून (J J Hospital) उपचारासाठी आणलेल्या एका महिला आरोपीने गर्दीचा फायदा घेत रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुबाना शेख (Rubana Shaikh) असे या महिला आरोपीचे नाव असून, ती फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत होती.
रुबाना शेख हिच्यावर यापूर्वी फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी तिला अटक करून भायखळा येथील महिला कारागृहात ठेवण्यात आले होते. रुबाना ही सुमारे पाच महिन्यांची गरोदर आहे. कारागृहात असताना तिला थंडी, ताप व त्वचेचे आजार जडले होते. त्यामुळे तिला अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारासाठी भायखळा कारागृहातून मुंबईतील जे जे रुग्णालयात हलविण्यात आले होते.
गर्दीचा फायदा घेत पलायन
उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या रूबानाने गर्दीचा फायदा घेत पोलिसांच्या देखरेखीखालून पलायन केले. ही घटना लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ परिसरात शोध सुरू केला.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी जे जे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र, महिलेने अचानक पलायन केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime : मुंबईत 81 वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात
दरम्यान, मुंबईतील 81 वर्षीय निवृत्त महिला सायबर गुन्हेगारांच्या “डिजिटल अटक” (Digital Arrest) स्कॅमला बळी पडली आहे. 10 जुलै रोजी अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलमध्ये, कॉल करणाऱ्याने स्वतःला पोलीस म्हणून ओळख दिली व महिलेवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला. विश्वास बसावा म्हणून कुलाबा पोलीस ठाण्याबाहेरचा स्वतःचा पोलीस वेशातील व्हिडीओ तिला पाठवण्यात आला. या बनावट आरोपांना घाबरून महिलेने स्वतःला घरात कोंडून घेतलं. गुन्हेगारांनी तिला धमकावून तिच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तब्बल 8.70 कोटी रुपयांची फसवणूक केली. पैसे संपल्यावर तिला बँक ठेवी, म्युचुअल फंड व शेअर्स विकून पैसे देण्यास भाग पाडण्यात आलं. एवढंच नाही, तर बँकेकडून विचारणा झाल्यास “दुबईत मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे पाठवत आहे,” असं सांगायला लावलं गेलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.