महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले; खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर आणखी गोत्यात, पुणे सायबर पोलि
Pranjal Khewalkar Booked : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडला आहे. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खराडीतील रेव्ह पार्टीप्रकरणी आधीच कोठडीत असलेल्या खेवलकरवर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या माहितीनुसार, खेवलकरच्या मोबाइलमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले होते. या उघडकीनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.
त्यानंतर आता नव्या प्रकरणात, एका महिलेच्या तक्रारीनुसार खेवलकरने तिची संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप आहे. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी आयटी अॅक्ट 66E आणि BNS कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर खेवलकरच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून त्याच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्यावर पुणे पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, IT Act 66E, BNS 77 अन्वये गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहमती नसताना फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा खेवलकर यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्यानंतर ते चर्चेत आले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.