पूर्वेश सरनाईक जय जवान गोविंदा पथकाला म्हणाले, ‘तुम्ही खेळाडू आहात, राजकारणात पडू नका’
जय जवान आणि प्रताप सरनाइक: मुंबई आणि ठाण्यात शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कालच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने 10 रचून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) एकदा नव्हे तर तीनवेळा 10 थर रचण्याची किमया करुन दाखवली. त्यामुळे हे गोविंदा पथक नेहमीप्रमाणे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र, काल जय जवान पथक आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरले. प्रो-गोविंदातून वगळल्यामुळे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याशी जय जवान गोविंदा मंडळाचा वाद झाला होता. या मंडळाने तशी नाराजीही बोलून दाखवली होती. यानंतर काल जेव्हा ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले तेव्हा प्रताप सरनाईक यांनी जय जवान मंडळाला टोमणा लगावला होता. मात्र, संध्याकाळी याच ठिकाणी जय जवानने 10 थर रचून सरनाईकांना कृतीतून खणखणीत प्रत्युत्तर दिले होते.
जय जवान गोविंदा पथकाने सरनाईकांच्या दहीहंडी उत्सवात 10 थर रचल्यानंतर एकच जल्लोष झाला होता. मात्र, जय जवानने 10 थर पूर्णपणे रचले नाहीत, असा सूर पूर्वेश सरनाईक यांच्या बोलण्यातून जाणवला. त्यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना म्हटले की, हा उत्सव आहे,उत्सवात कुठेही गोंधळ होता कामा नये. पण सगळ्यंच्या मनाची इच्छा होती, 10 थरांची. आपण दहीहंडीचे थर रचतो त्यानंतर कडक हात वर करुन सलामी देतो. पण जय जवान मंडळ थोडक्यात हुकले. पण मी त्यांना सांगितलं की, प्रताप सरनाईक साहब का दिल बहोत बडा है! मी जय जवान गोविंदा पथकाला आमच्या इथे आमंत्रण दिले होते, तेदेखील इकडे आले. शेवटी हा खेळ आहे, यामध्ये राजकारण येता कामा नये. देवाची इच्छा होती, सरनाईक साहेबांकडेच जय जवान मंडळाचे नऊ थर लागले होते, आता त्यांच्या मैदानातच दोन वेळा 10 थर लागले. आम्ही जे करतो ते गोविंदा पथकांसाठीच करतो. मी जय जवान गोविंदा पथकाला सांगितले की, शेवटी तु्म्ही खेळाडू आहात, खेळाडूंनी राजकारणात पडायला नको. आमच्या परिवारापासून जय जवानला काही जणांना दूर करायचं होतं, म्हणून काही जणांनी राजकारण केले, असे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले.
प्रताप सरनाइक: प्रताप सारनाई जय जवान गोविंदा गोविंदा टिम्ना आहे?
कोणी काहीही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना वाटत असतं की, आमचा विश्वविक्रम मोडणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत. पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की, विश्वविक्रम ही कोणा एकाची मक्तेदारी नसते. विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जय जवान गोविंदा पथकाच्या दिशेने होता. जय जवान पथकानेही नऊ थरांचा विक्रम आपल्याच संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला होता, असेही प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते.
https://www.youtube.com/watch?v=5ahfzxys7km
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.