संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात 3 तास सुनावणी, वाल्मिक कराडच्या वकिलांचा पावणेदोन तास युक्तिवाद

अंडे: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गाजलेल्या प्रकरणात आज तब्बल तीन तास न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलाने तब्बल 1 तास 45 मिनिटांचा युक्तिवाद करीत त्याची बाजू जोरदार मांडली. मात्र न्यायालयाने कोणताही निर्णय न देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. एवढंच नव्हे तर या खटल्यातील इतर आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी ठाम आक्षेप घेतला. “हा खटला गंभीर असून आरोपींना कोणतीही सवलत मिळू नये,” असा ठाम पवित्रा निकम यांनी न्यायालयात मांडला. आरोपींना जामीन मिळतो का, दोषमुक्त केले जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचं डोळे लागले  असून या दिवशी न्यायालयीन निर्णयाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

निबंध मकोका कोर्ट मोनिस

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदविले आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. या अर्जावर निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत. वाल्मिक कराडला दोष मुक्त का केले जात नाही? याबाबत हे निरीक्षण नोंदवले गेले आहे. वाल्मीक कराडला दोष मुक्त केला जात नाही याचं कारण सांगताना न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली . विशेष मकोका न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचं निरीक्षण नोंदवलंय .

वाल्मिक कराडचे वकील हायकोर्टात दाद मागणार

22 जुलै रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर कराडच्या वकिलाने म्हणणे मांडले होते. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करून कराडच्या दोष मुक्ती अर्जाला कडाडून विरोध केला होता. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या  प्रकरणात आज तब्बल तीन तास न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलाने तब्बल 1 तास 45 मिनिटांचा युक्तिवाद करीत त्याची बाजू जोरदार मांडली. मात्र न्यायालयाने कोणताही निर्णय न देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.