टीम इंडियाच्या शापित गंधर्वाने पुन्हा डोळे दिपवले, 105 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं

सरफराज खान केंद्रात मुंबईसाठी बुची बाबू ट्रॉफी: दोन महिन्यांत तब्बल 17 किलो वजन घटवून चर्चेत आलेल्या सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्या बॅटने जोरदार उत्तर दिलं आहे. बुची बाबू ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी मुंबईकडून खेळताना त्याने तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA XI) विरुद्ध तुफानी शतक ठोकलं. 92 चेंडूत त्याने 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शंभर धावा ठोकल्या. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 105 होता.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण 98 धावांवर 3 गडी बाद झाले आणि संघ अडचणीत आला. याच वेळी सरफराज मैदानात उतरला. 33 व्या षटकात आलेल्या सरफराजने पुढील 31 षटकांत धडाकेबाज खेळ करत शतक पूर्ण केलं आणि संघाला साथ दिली.

दोन महिन्यांत 17 किलो वजन मजबूत होते.

सरफराज खानने दोन महिन्यांत तब्बल 17 किलो वजन कमी करून स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर त्याच्या फिटनेसची खूप चर्चा झाली. तरीसुद्धा त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळालं नाही. पण त्याने हार न मानता इंडिया ए कडून इंग्लंड लायन्सविरुद्ध 92 धावा ठोकल्या होत्या. आता फिटनेस आणि फॉर्म या दोन्ही आघाड्यांवर सरफराजनं स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याने अशाच प्रकारे धडाकेबाज खेळ सुरू ठेवला, तर भारतीय कसोटी संघात पुनरागमन नक्की होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आयुशा महाते, मुशिर खान अयशस्वी झाले

मुंबईसाठी आयुष म्हात्रे आणि मुशीर खान हे दोन्ही सलामीवीर फेल ठरले. मुंबईला पहिला धक्का नवव्या षटकात लागला. आयुष म्हात्रेचा प्रेम कुमारच्या चेंडूवर सोनू यादवने झेल घेतला. म्हात्रेने 25 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या. त्यानंतर मुशीर खान आणि सुवेद पारकर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी झाली. पण 30व्या षटकात मुशीर बाद झाला. त्याने 75 चेंडूत 1 चौकारासह 30 धावा केल्या. त्यानंतर सरफराजच्या शतकामुळे मुंबईने जोरदार पुनरागमन करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली आहे.

हे ही वाचा –

Pakistan Squad For Asia Cup 2025 : पाकिस्तानी सिलेक्टर्सनी टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरु शकणाऱ्या खेळाडूलाच संघातून वगळलं, जावेद मियाँदाद संतापला, म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.