शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
छगन भुजबाल: आपण स्वदेशीचा नारा देतोय, पण आधी स्वदेशी मनुष्य जगवा. यासाठी शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा, असा उपरोधिक सल्ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारला दिलाय. पुण्यातील (Pune News) जुन्नरमधील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, देशात कृषिमंत्री म्हणून ज्यांचं लौकिक आहे, त्या शरद पवार साहेबांचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. ते आपल्याला मान्य करायला हवं, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. सरकार आपल्याला भरीव मदत करते, मात्र त्याचा उपयोग आपण कसा करतोय, हे महत्त्वाचं आहे. मुळात मी हे बोलणं उचित नाही, कारण मी अन्न पुरवठा मंत्री आहे. तुम्ही जे अन्न तयार करता, त्यानंतर माझं काम सुरु होतं. त्यामुळं तुम्ही अन्न बनवलं नाही तर माझं काम बंद पडेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
अन्न-धान्य साठवणूक हा देशात महत्त्वाचा मुद्दा
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, अन्न-धान्य साठवणूक हा देशात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल, असं आम्ही सरकार म्हणून काही करणार नाही. म्हणूनच स्वदेशी हा नारा दिला आहे. मोदी साहेबांनी सुद्धा स्वदेशीकडे चला हा नारा दिलाय. शेतकऱ्यांना दोन महत्वाच्या अडचणी आहेत. काही संकटं तर अस्मानी आहेत. पाणी आलं, नाही आलं, वाहून गेलं. हे अस्मानी संकट आहे आणि दुसरं संकट हे मानवनिर्मित आहे. पीक उगवलं की बंधनं आणली जातात. हे बंधन, ते बंधन. कधी आयात-निर्यात करा, मग लगेच करु नका. इथेनॉल करा, इथेनॉल बंद नका. कांदा सुरू, कांदा बंद. कशासाठी हे सगळं? आता याला तोंड द्यायचं म्हटल्यावर आपल्याला मानवी संकटं आणणाऱ्या यंत्रणा, त्यांना सुद्धा सांगावं लागेल.
शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा
आपण स्वदेशीचा नारा देतो, त्यावेळी स्वदेशी मनुष्य सुद्धा जगवावा लागेल. जिथं-तिथं दोन पैसे मिळू शकतात, ती दारं आपल्याला उघडावी लागतील. तुम्हीचं त्याच्यावर आणखी-आणखी बंधनं आणून चालणार नाही. कपडा, गाड्या अनेक वस्तूवर आपण बंधनं आणत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर तेवढं बंधनं आणतो. त्यामुळं विचार बदलण्याची आवश्यकता आहे. सगळं वाढवायचं अन करायचं हे बरोबर आहे, मात्र ही बंधनं हटवायला हवीत, असा उपरोधिक सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. तसेच पुण्यातील, नाशिकमधील अनेक नेत्यांनी यासाठी लढा दिला. पवार साहेबांनी सुद्धा याबाबत अनेकदा मदत केली, आजही ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते मदत करत असतात, असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
मनो मनो मनोनागी पाटील यांच्यासह चांग भुजबाल: चळवळ, ते श्रम करण्यावर हताश झालेल्यांच्या हातांना दप.
आणखी वाचा
Comments are closed.